Murder case || २४ तासांच्या आत खुनाचा गुन्हा उघडकीस: मोबाईलच्या संशयावरून मित्राची हत्या करणारा आरोपी अटकेत..!

Jul 5, 2026 - 13:04
 0
Murder case || २४ तासांच्या आत खुनाचा गुन्हा उघडकीस: मोबाईलच्या संशयावरून मित्राची हत्या करणारा आरोपी अटकेत..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

महाळुंगे इंगळे(चाकण) : मोबाईल घेतल्याच्या संशयावरून आपल्या मित्राची निर्घृण हत्या करून फरार झालेल्या आरोपीला दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. या धडाकेबाज कामगिरीमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नेमकी घटना काय?

दिनांक २ जुलै २०२६ रोजी रात्री १० च्या सुमारास, महाळुंगे येथील निधोजे-मोई रोडवरील गुरुपा गृहनिर्माण सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर एका व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती डायल ११२ वर मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, मृत व्यक्तीची ओळख चांद याकूब शेख (वय ४२, रा. केशवनगर, चिखली) अशी पटली. या प्रकरणी मृताची पत्नी शेजनाज चांद शेख यांच्या तक्रारीवरून दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांची धडाकेबाज कामगिरी..

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून परिमंडळ ४ च्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि साक्षीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत चांद शेख हा आरोपी हिरालाल सुभाषचंद्र गौतम याच्यासोबत राहत होता आणि हत्येनंतर हिरालाल दोन दिवसांपासून फरार असल्याचे समोर आले.

पोलिसांनी तातडीने तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये, पोलीस हवालदार बिराजदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वाघोली-केसनंद परिसरात रवाना केले. पोलिसांनी सापळा रचून आरोपी हिरालाल गौतम याला अवघ्या २४ तासांच्या आत शिताफीने अटक केली.

आरोपीची कबुली...

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मृत चांद शेख याने आपला मोबाईल चोरल्याच्या संशयावरून आपण त्याला गंभीर जखमी करून ठार मारले, अशी कबुली आरोपी हिरालाल गौतम (वय २८, मूळ रा. इटावा, उत्तर प्रदेश) याने दिली आहे.

तपासी पथकाचे कौतुक...

सदर कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, सह-पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये आणि पोलीस कर्मचारी चेतन सावंत, नरहरी नाणेकर, युवराज बिराजदार, राजेंद्र खेडकर, राजेंद्र गिरी, प्रशांत कसबे, महेश गायकवाड, आकाश घाडगे, शिवाजी मरकड या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल देवडे करत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी