Extortion Case || चाकण हादरले: खंडणीखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 'मनसे' पदाधिकाऱ्याला बेड्या; खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
आळंदी : सुरक्षेचा व्यवसाय बंद पाडण्याची धमकी देऊन, जीवे मारण्याची भीती घालून खंडणी उकळणाऱ्या एका रेकॉर्डवरील आरोपीला खंडणी विरोधी पथकाने गजाआड केले आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव महेश सखाराम शिरोळे असे असून, तो चाकण येथील रहिवासी आहे.

नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महेश शिरोळे याने फिर्यादी यांना 'जर तुला सिक्युरिटीचा व्यवसाय चालवायचा असेल, तर मला १० लाख, ८ लाख, ७ लाख व ६ लाख रुपये द्यावे लागतील', अशी मागणी केली होती. तसेच, 'चाकणमध्ये माझी मोठी दहशत आहे, अन्यथा मी तुला खल्लास करून टाकेन', अशी गंभीर धमकी दिली होती. या दबावामुळे फिर्यादीने खंडणी विरोधी पथकाच्या मोरवाडी, पिंपरी येथील कार्यालयात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
अशी झाली कारवाई:
तडजोडीअंती ३ लाख रुपये स्वीकारताना खंडणी विरोधी पथकाने ३० जून २०२६ रोजी आळंदी-पुणे रस्त्यावरील मॅक्झिम चौकातील स्वच्छतागृहाजवळ सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०८(२) आणि ३०८(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त केलेला मुद्देमाल:
कारवाई दरम्यान आरोपीकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:
• ६,००० रुपये रोख (ज्यात ५०० रुपयांच्या खऱ्या नोटा आणि चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या ५०० रुपयांच्या डमी नोटांचा समावेश आहे).
• ५०,००० रुपये किमतीचा आयफोन-१३ मोबाईल.
• १०,५०,००० रुपये किमतीची मारुती सुझुकी ब्रिझा कार (क्रमांक MH-14-ND-6297).
• एकूण जप्त मुद्देमाल: ११,०६,००० रुपये.
सदर हि यशस्वी कारवाई खंडणी विरोधी पथकाचे वपोनि राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, यामध्ये पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमर राऊत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कानगुडे, तसेच प्रदीप पोटे, प्रदीप गोडांबे, चंद्रकांत जाधव, गणेश गिरीगोसावी, किरण जाधव, किशोर कांबळे आणि संदीप गंगावणे व निलेश जाधव यांचा समावेश होता.
What's Your Reaction?
Like
5
Dislike
1
Love
0
Funny
0
Angry
1
Sad
4
Wow
0