Confusion in the Trust Constitution || कळसेश्वर देवस्थानचे ‘मालक’ होऊ पाहणाऱ्यांचा बुरखा फाडा! घटनेत शब्दांचा खेळ करणारा तो ‘शुक्राचार्य’ कोण?
गावकऱ्यांनो आता तरी जागे व्हा; नाहीतर पिढ्यानपिढ्या देवस्थान गहाण पडेल!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
अकोले (अहिल्यानगर): भक्ती आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या कळस बुद्रुक येथील कळसेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये सध्या हुकूमशाहीचा वास येऊ लागला आहे. देवस्थानच्या मूळ घटनेत शब्दांची फेरफार करून काही विश्वस्तांनी स्वतःला ‘आजीवन (तहहयात)’ मालक म्हणून प्रस्थापित करण्याचा जो डाव आखला आहे, तो उघड झाला आहे. या घटनेतील गोलमालमुळे गावाच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला असून, "ग्रामस्थांची दिशाभूल करणारा तो 'शुक्राचार्य' कोण?" असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

घटनेत शब्दांचा खेळ; मालकी हक्काचा प्रयत्न!
ट्रस्टच्या घटनेत बदल करताना अत्यंत धूर्तपणे शब्दांचा खेळ खेळण्यात आला आहे. लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या देवस्थानला स्वतःची खाजगी मालमत्ता समजून, काही ठराविक लोकांनी 'तहहयात विश्वस्त' राहण्याचा घाट घातला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, काही विश्वस्तांना तर 'घटना' म्हणजे काय, याचा गंधही नाही! तर काही जण देवाच्या कोपाला घाबरून दबक्या आवाजात "ज्याने हे केलं त्याला देव माफ करणार नाही" असे म्हणून हात झटकत आहेत.
पत्रकारांना धमकावणारी ती 'अदृश्य' शक्ती कोणाची?
जेव्हा या अन्यायाविरुद्ध प्रसारमाध्यमे आवाज उठवतात, तेव्हा अधिकृत लेटरहेडचा वापर न करता कोऱ्या कागदावर पत्रे टाईप करून पत्रकारांना फौजदारी कारवाईच्या धमक्या दिल्या जातात.
• हे धमकीवजा पत्र कोणाच्या सांगण्यावरून फिरवले गेले?
• शासकीय मानधन घेऊन सचिव पदावर बसलेली व्यक्ती अशा प्रकारे ट्रस्टच्या कारभारात नियमबाह्य हस्तक्षेप करू शकते का?
• गावातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर अफवा पसरवणारा मुख्य सूत्रधार कोण?
हे सर्व प्रश्न आता संशोधनाचा विषय ठरत आहेत.
ग्रामस्थांनो, गप्प बसलात तर देव तरी माफ करेल का?
निवडक विश्वस्त सोडले तर इतरांचे देवासाठी आणि गावासाठी नक्की योगदान काय? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. श्रद्धेच्या ठिकाणी स्वार्थाचे राजकारण करणाऱ्या या प्रवृत्तींना वेळीच चाप लावणे गरजेचे आहे. जर आज गावकरी गप्प राहिले, तर उद्या देवस्थानची मालकी काही विशिष्ट घराण्यांकडे जाईल आणि ग्रामस्थांचे अधिकार संपुष्टात येतील.
"घटनेतील ही तोडमोड ज्याने केली, त्याने ती गावच्या साक्षीने दुरुस्त करून द्यावी. अन्यथा, ही पेटलेली ठिणगी आता विझणार नाही. गावकऱ्यांनो, दबावाला बळी पडू नका, अन्यथा गप्प राहण्याचे मोठे प्रायश्चित्त भविष्यात भोगावे लागेल!"
हिच ती वेळ गावकऱ्यांनो..
कळस बुद्रुकच्या ग्रामस्थांनी आता एकत्र येऊन या 'मालक' होऊ पाहणाऱ्या विश्वस्तांना जाब विचारण्याची वेळ आली आहे. ही ठिणगी आता अन्यायाविरुद्धच्या वणव्यात रूपांतरित व्हायला हवी, तरच कळसेश्वर मंदिराचे पावित्र्य आणि गावाचा मान टिकून राहील.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
1
Love
0
Funny
0
Angry
2
Sad
0
Wow
0