सामाजिक : शेगाव दुमाला श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ धर्मशाळेचा वास्तूशांती व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न होणार..

Jun 21, 2026 - 13:02
Jun 21, 2026 - 14:02
 0
सामाजिक : शेगाव दुमाला श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ धर्मशाळेचा वास्तूशांती व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न होणार..

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

पंढरपूर: श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ, खेड तालुका (पश्चिम विभाग), शेगाव दुमाला येथे बांधण्यात आलेल्या नवीन धर्मशाळेची वास्तूशांती, उद्घाटन, तसेच कलशारोहण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा बुधवार, दिनांक २४ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शेगाव दुमाला, ता. पंढरपूर, जि. सोलापूर येथील धर्मशाळेच्या परिसरात संपन्न होणार आहे.


​या सोहळ्याचे अध्यक्षपद मा. मंत्री दिलीपराव वळसे पाटील हे भूषविणार आहेत. प्रमुख उपस्थिती आमदार बाबाजी काळे व माजी आमदार दिलीप मोहिते पाटील तसेच सर्व तालुक्यातील अधिकारी व पदाधिकारी, वारकरी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवाची. या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ, खेडे तालुका (पश्चिम विभाग) यांचे सर्व पदाधिकारी व माजी विश्वस्त कार्यभार पाहत आहेत.

ज्ञानेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण देत आहोत.

​या मंगलमय प्रसंगाच्या निमित्ताने बिरदवडीचे माजी सरपंच बाबासाहेब पवार पंढरपूरचे वारकरी यांनी या पवित्र सोहळ्यासाठी आपले मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.


​या भव्य सोहळ्यात विधीवत यज्ञ, मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण, महाप्रसाद, उद्घाटन सोहळा आणि ह.भ.प. रंगनाथ महाराज नाईकडे यांचे कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी