ना श्रीमंती, ना पैसा - ना गाडी, ना बंगला.! साधी राहणी, पण संपूर्ण विदर्भात एकच नाव चर्चेत - ‘रक्तमित्र’ रोहित भुते...
भंडारा प्रतिनिधी - नितीन वरगंटीवार
भंडारा : लाखांदूर तालुक्यातील सरांडी या छोट्याशा गावातून सामाजिक कार्याची मोठी ओळख निर्माण करणारे रोहित भुते आज अनेकांसाठी आशेचा किरण ठरत आहेत.
रक्तदान आणि सामाजिक कार्याला वाहून घेतलेल्या रोहित यांनी आपल्या सेवाभावी वृत्तीने संपूर्ण विदर्भात ‘रक्तमित्र’ म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.
गावातील विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग असतो. विशेष म्हणजे रुग्ण कोणत्याही रुग्णालयात उपचार घेत असो, त्याला रक्ताची गरज भासली की एका फोनवर मदतीसाठी धावून जाण्याची त्यांची आणि त्यांच्या रक्त मित्र टीमची तत्परता अनेक रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोठा आधार ठरते.
रक्तदान म्हणजे केवळ रक्त देणे नाही, तर एखाद्याचे जीवन वाचविण्याची संधी आहे, हा संदेश आपल्या कृतीतून रोहित भुते देत आहेत. प्रसिद्धी, पैसा किंवा दिखावा न करता समाजासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या अशा तरुणांची आज समाजाला खरी गरज आहे.
साधेपणातून मोठेपण जपणाऱ्या रोहित भुते यांच्या सामाजिक कार्याला सलाम!
त्यांचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी असून, ‘एक रक्तदाता — एक जीवनदाता’ हा विचार समाजात रुजविण्याची गरज आहे.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0