भक्तीसागर || संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त भाम येथे रंगला 'ज्ञानमाऊली'चा जागर..!

Sep 5, 2026 - 11:54
 0
भक्तीसागर || संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त भाम येथे रंगला 'ज्ञानमाऊली'चा जागर..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

राजगुरूनगर(खेड) : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मजयंती वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने खेड तालुक्यातील संतोषकनगर-भाम येथील 'रसिका पॅलेस'मध्ये ‘ज्ञानमाऊली’ या विशेष सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. टाळ-मृदंगाचा गजर आणि भक्तिसंगीताच्या सुरावटीत हा सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महसूल विभागात या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमाचा प्रारंभ राज्यगीताने झाला. त्यानंतर प्रसिद्ध वक्ते गणेश शिंदे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका मांडली. भाजपचे विशेष निमंत्रित सदस्य डॉ. राम गावडे यांनी उपस्थितांना शुभेच्छा देताना ज्ञानेश्वर माऊलींच्या समतावादी विचारांची आणि वारकरी संप्रदायाच्या कार्याची महती विशद केली.

भक्तिसंगीताने श्रोते मंत्रमुग्ध..

या सोहळ्यात सुप्रसिद्ध गायिका सन्मिता धापटे-शिंदे यांनी ‘बोलावा विठ्ठल’ हा अभंग सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. त्यानंतर भजनसम्राट प्रदीप मोहिते यांनी सादर केलेल्या विविध भक्तीगीतांनी संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले. ह.भ.प. सोमनाथ महाराज भालेराव यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी प्रसंगाचे अत्यंत भावपूर्ण निरूपण केले. सामूहिक पसायदानाने या सुरेल महोत्सवाची सांगता झाली.


मान्यवरांची उपस्थिती..

या आध्यात्मिक मेळाव्याला सामाजिक, राजकीय व वारकरी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. यामध्ये भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष शांताराम भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, वारकरी महामंडळाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मुक्ताजी नाणेकर, खेड तालुका अध्यक्ष अशोक येळवंडे, कार्याध्यक्ष एकनाथ टोपे, जिल्हा सरचिटणीस प्रिया पवार, लोकनियुक्त सरपंच शरद कड, वकील संघटनेचे माजी अध्यक्ष सुभाष कड, भाजप युवा नेते संदेश जाधव, बबन टोपे, भालेराव कड-पाटील, नगरसेवक सुनील झोंबाडे, ग्रामपंचायत सदस्य सुजित टोपे, व्याख्याते शुभम गाडगे, प्रा. वामन गव्हाणे आणि सत्यवान सहाणे आदींचा समावेश होता.

याशिवाय भैरवनाथ प्रासादिक दिंडी, भक्ती-शक्ती दिंडी, आळंदी येथील संतकृपा संस्थेचे विद्यार्थी आणि परिसरातील वारकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आदेश टोपे यांनी केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी