तक्रार नोंदवण्यासाठी तासन् तास प्रतीक्षा; CCTNS प्रणालीचा खो,पोलीस ठाण्याच्या विभाजनाचा फुगा फुटला!

Mar 2, 2026 - 11:44
 0
तक्रार नोंदवण्यासाठी तासन् तास प्रतीक्षा; CCTNS प्रणालीचा खो,पोलीस ठाण्याच्या विभाजनाचा फुगा फुटला!

​लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

महाळुंगे(खेड): चाकण परिसरातील वाढती गुन्हेगारी आणि औद्योगिक पट्ट्याचा विस्तार लक्षात घेता, दोन महिन्यांपूर्वी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे विभाजन करून 'उत्तर महाळुंगे' आणि 'दक्षिण महाळुंगे' अशी दोन नवीन पोलीस ठाणी कार्यान्वित करण्यात आली. प्रशासनाने हे विभाजन मोठ्या थाटात आणि घाईत केले खरे, परंतु सुविधांच्या अभावामुळे आता हेच पोलीस ठाणे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

डिजिटल युगात 'पेन ड्राईव्ह'चा आधार!

​उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली 'गुन्हा आणि गुन्हेगार मागोवा जाळे आणि प्रणाली' (CCTNS) अद्याप सुरू झालेली नाही. परिणामी, एखादा नागरिक तक्रार घेऊन आल्यास पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.

• ​प्रक्रिया काय? : आधी तक्रार कच्च्या स्वरूपात कागदावर नोंदवली जाते.

• ​कसरत : तो डेटा पेन ड्राईव्हमध्ये घेऊन कर्मचाऱ्यांना 'दक्षिण महाळुंगे' पोलीस ठाण्यात जावे लागते.

• ​विलंब : तिथे जाऊन ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर मगच FIR ची प्रत मिळते. या संपूर्ण प्रक्रियेत एका तक्रारदाराला तब्बल ३ ते ४ तास ताटकळत बसावे लागते.

नागरिक आणि कर्मचाऱ्यांचा मानसिक मनस्ताप..

​न्याय मिळवण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना या तांत्रिक घोळामुळे मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, केवळ नागरिकच नाही तर पोलीस कर्मचाऱ्यांनाही या धावपळीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत असून कामाचा ताण वाढत आहे. मूलभूत भौतिक सुविधांशिवाय पोलीस ठाणे सुरू करण्याच्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या 'घाई'वर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हद्दींचा गुंता कायम..

​शासनाचा अधिकृत आदेश नसतानाही दोन्ही पोलीस ठाण्यांच्या गाव हद्दी अत्यंत गुंतागुंतीच्या करून ठेवल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. हद्दीचा वाद आणि त्यात तांत्रिक सुविधांचा अभाव यामुळे स्थानिक जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

"या भागाचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी पोलीस ठाण्याच्या गाव हद्दी संदर्भात उपमुख्यमंत्री सुनीत्राताई पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. लवकरच या महत्त्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री महोदयांची वेळ घेऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची विनंती करणार आहे."

— गणेश बोत्रे, (जिल्हा परिषद सदस्य)

प्रशासनासमोर मोठे आव्हान:

आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तातडीने CCTNS प्रणाली कार्यान्वित करणार की नागरिकांची ही हेळसांड अशीच सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 1
Wow Wow 1
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी