Former Sarpanch Beaten || मुजोरीला बसला चाप! गोनवडीच्या माजी सरपंचाची बिरदवडीत 'यथोच्छ धुलाई'..!

May 7, 2026 - 08:26
 0
Former Sarpanch Beaten || मुजोरीला बसला चाप! गोनवडीच्या माजी सरपंचाची बिरदवडीत 'यथोच्छ धुलाई'..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी: आशिष ढगे पाटील

​चाकण: पदाचा विनाकारण माज आणि वर्तणुकीत प्रचंड मुजोरी असणाऱ्या खेड तालुक्यातील गोनवडी गावच्या एका माजी सरपंचाला बिरदवडी येथे चांगलाच चोप मिळाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हॉटेलवर जाऊन कामगारांना दमदाटी करणे या महाशयांच्या अंगलट आले असून, हॉटेल चालकाने त्यांना असा काही धडा शिकवला की, आता हे माजी सरपंच गावात तोंड दाखवायलाही घाबरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर माजी सरपंच हा स्वतःला गावचा सर्वेसर्वा समजून नेहमीच अविर्भावात वागत असतो. सरपंच पदाच्या कार्यकाळातही याने अनेक उपदव्याप केल्याची चर्चा संपूर्ण गावात दबक्या आवाजात सुरू आहे. 'माझ्यासमोर कोणाचे काही चालत नाही' अशा भ्रमात राहणाऱ्या या माजी सरपंचाने काल आपला मोर्चा बिरदवडी येथील एका हॉटेलकडे वळवला.

नेमका प्रकार काय घडला?

हा महाशय हॉटेलवर येण्यापूर्वीच दारूच्या नशेत तर्रर्र होता. हॉटेलवर पोहोचताच त्याने तेथील कामगारांवर आपला 'सरपंचाचा' रुबाब गाजवण्यास सुरुवात केली. "चल रे, मला दारू दे, नाहीतर बघून घेईल," अशी धमकी देत त्याने कामगारांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, त्याने थेट "हॉटेल बंद कर," अशी बतावणी करत राडा घालण्याचा प्रयत्न केला.

मुजोरी निघाली बाहेर:

नेहमीच लोकांवर दादागिरी करणाऱ्या या माजी सरपंचाला हॉटेल चालकाने यावेळी चांगलेच धारेवर धरले. कामगारांना विनाकारण त्रास दिल्याने संतापलेल्या हॉटेल चालकाने या माजी सरपंचाला बाजूला नेऊन त्याची 'यथोच्छ धुलाई' केली. काही वेळातच या महाशयाचा सर्व रुबाब हवेत विरला. "मला मारू नका, मी पुन्हा इकडे येणार नाही," अशी विनवणी करत या माजी सरपंचाने तेथून पळ काढला. विशेष म्हणजे हा सरपंच पण.. मोहिते आहे आणि हॉटेल चालक पण.. मोहितेचं आहे. त्यामुळे कुठे तरी या माजी सरपंच याला रुबाब कुठे करायचा हेही समजायला हवे होते.

एकेकाळी सत्तेचा माज दाखवून गावाला वेठीस धरणाऱ्या या व्यक्तीला हॉटेल चालकाने जो धडा शिकवला, त्याची चर्चा आता संपूर्ण खेड तालुक्यात रंगली आहे. अशा 'तराट' प्रवृत्तीच्या लोकांमुळे गावाचे नाव खराब होत असून, आता तरी या माजी सरपंचाची मुजोरी कमी होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

What's Your Reaction?

Like Like 5
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 1
Angry Angry 0
Sad Sad 1
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी