Dahi Handi Event || उत्तर पुणे जिल्ह्यात दहीहंडीचा थरार! अक्षयदादा जाधव युवा मंचाचे भव्य आयोजन; गोविंदा पथकांवर होणार बक्षिसांची बरसात..!

Sep 5, 2026 - 08:23
 0
Dahi Handi Event || उत्तर पुणे जिल्ह्यात दहीहंडीचा थरार! अक्षयदादा जाधव युवा मंचाचे भव्य आयोजन; गोविंदा पथकांवर होणार बक्षिसांची बरसात..!

लोकन्याय मराठी विशेष 

चाकण :: उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि मानाची दहीहंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भव्य दहीहंडी उत्सवाचा थरार आज चाकणमध्ये अनुभवायला मिळणार आहे. अश्वमेघ फाउंडेशन आणि अक्षयदादा जाधव युवा मंच (खेड तालुका) यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा नेते अक्षयदादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेली ही परंपरा यंदा आणखी मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात साजरी होत आहे.

मनोरंजनाची मेजवानी अन् कलाकारांची मांदियाळी..

यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मराठी चित्रपट व मालिका विश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींची उपस्थिती असणार आहे. अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर, महिमा म्हात्रे आणि सोनाली पाटील यांच्या ग्लॅमरस उपस्थितीने सोहळ्याची रंगत वाढणार आहे. तसेच ‘महाराष्ट्र सुंदरी’ आणि महाराष्ट्राची प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गऊ खुडे यांच्या बहारदार लावणी नृत्याचा विशेष कार्यक्रम या दहीहंडीच्या मंचावर रंगणार असून रसिकांना संगीतमय मेजवानी मिळणार आहे.

गोविंदा पथकांवर बक्षिसांची बरसात..

उत्सवात मानाची दहीहंडी फोडण्यासाठी राज्यभरातील नामांकित गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. गगनचुंबी मानवी मनोरे रचणाऱ्या पथकांसाठी आयोजकांच्या वतीने भरघोस रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ढोल-ताशांचा दणदणाट, तरुणाईचा सळसळता उत्साह आणि थरारक मनोरे यामुळे संपूर्ण चाकण परिसर 'गोविंदा आला रे...' च्या जयघोषाने दुमदुमून जाणार आहे.

सामाजिक बांधिलकीची परंपरा..

केवळ उत्सवी स्वरूप न ठेवता सामाजिक भान जपणारे नेतृत्व म्हणून अक्षयदादा जाधव यांची खेड तालुक्यात ओळख आहे. महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’, ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांची जनजागृती व मार्गदर्शन शिबिरे अशा अनेक लोकोपयोगी उपक्रमांनंतर आता या भव्य सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवाची वेळ व ठिकाण..

• ​तारीख व वेळ: आज शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता.

• ​स्थळ: पुणे–नाशिक महामार्ग, विशाल कॅपिटलसमोर, ग्रँड सेंट्रल शेजारील मैदान, चाकण (ता. खेड, जि. पुणे).

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी