Political Activity || कल्याणराव आखाडे यांना विधान परिषदेवर संधी द्या; सावता परिषदेचे सुनील तटकरे यांना निवेदन..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
पुणे : सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष श्री. कल्याणराव आखाडे (काका) यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळावी, अशी आग्रही मागणी सावता परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गणेशराव दळवी यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांची रोहा येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात भेट घेतली व त्यांना मागणीचे निवेदन सादर केले.
कल्याणराव आखाडे यांनी बहुजन समाजाच्या प्रश्नांवर आणि पक्ष संघटनेत दिलेले योगदान विचारात घेता, त्यांना विधान परिषदेवर पाठवून न्याय द्यावा, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. या भेटीदरम्यान संघटनात्मक बांधणीवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष गणेशराव दळवी यांच्यासोबत प्रदेश कार्याध्यक्ष संतोष राजगुरू, पुणे जिल्हा अध्यक्ष गोरक्ष (नाना) भुजबळ, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आल्हाट, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र गायकवाड, ह.भ.प. अशोकराव भुजबळ, ज्येष्ठ नेते सुदामराव भुजबळ, उद्योजक तुषार शेठ राख, भरतराव आल्हाट आणि राजू शेठ केदारी यांसह सावता परिषदेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0