🔪 सोशल मीडियावर कोयत्याचा 'धसका'; फोटो व्हायरल करणारा तरुण गजाआड!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
आळंदी : सोशल मीडियावर कोयता हातात घेऊन फोटो व्हायरल करत दहशत पसरवणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई चऱ्होली खुर्द (आळंदी) परिसरात करण्यात आली.
नेमकी घटना काय?
गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, एक तरुण कोयता घेऊन चऱ्होली खुर्द येथील शिवण्या हॉटेल परिसरात थांबला आहे. ही माहिती मिळताच, पोलीस हवालदार श्रीधन इचके, पोलीस शिपाई समीर काळे आणि शशिकांत नांगरे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संशयास्पद हालचाली करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे धारदार कोयता मिळून आला.
आरोपीची माहिती:
• नाव: शिवदास ऊर्फ नितीन राजाभाऊ लावटे
• वय: २२ वर्षे
• राहणार: बालाजीनगर, चाकण, जि. पुणे (मूळ गाव: पालम, जि. परभणी)
कारवाई:
आरोपीवर शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ (२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आळंदी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी करत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0