राजकीय : खराबवाडी येथील 'सारा सिटी फेज डी' सोसायटीची नूतन कमिटी बिनविरोध; सोमनाथ पाटोळे यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण (पुणे): खराबवाडी येथील 'सारा सिटी फेज डी सहकारी संस्था मर्यादित' सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 'शिवशक्ती सहकार पॅनेल'ची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोसायटीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सोमनाथ काशिनाथ पाटोळे यांची अध्यक्षपदी, तर बाळासाहेब विश्राम कासार यांची सचिवपदी निवड झाली आहे.

सोसायटीमध्ये सध्या पाणी पुरवठा आणि इतर मूलभूत भौतिक सुविधांचा मोठा अभाव असून, हे नूतन कमिटीसमोर मोठे आव्हान असणार आहे. नवनियुक्त अध्यक्ष सोमनाथ पाटोळे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने अहोरात्र कष्ट घेऊन सोसायटीचे रूप पालटण्याचा चंग बांधला आहे. मागील काही काळातील कमिटी सदस्यांकडून झालेला मानसिक त्रास आणि विविध अडथळ्यांवर मात करत, पाटोळे यांनी केवळ सोसायटीच्या हितासाठी दिलेला लढा आता सर्व सभासदांच्या सहकार्याने यशस्वी होताना दिसत आहे.

सोसायटीच्या हितासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व सदसांनी या निवडीचे स्वागत केले आहे. या निवडीबद्दल श्री गणेश मित्र मंडळ आणि सारा सिटी डी फेज सोसायटीच्या सर्व सभासदांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
नूतन कमिटी पदाधिकारी व सदस्य खालीलप्रमाणे:
सोमनाथ काशिनाथ पाटोळे - अध्यक्ष
बाळासाहेब विश्राम कासार - सचिव
प्रकाश चंद्रकांत कुलकर्णी - खजिनदार
शरद विठोबा जागुष्टे - सदस्य
दत्तात्रय रंगनाथ पोळ - सदस्य
राजू एकनाथ मोरे - सदस्य
दत्तात्रय जगन्नाथ चव्हाण - सदस्य
विशाल अशोक पवार - सदस्य
जितेंद्र सोमनाथ गढरी - सदस्य
राहुल कलगोंडा पाटील - सदस्य
सागर सुभाष शितोळे - सदस्य
प्रवीण संजय चव्हाण - सदस्य
कमलाकर भिका तायडे - सदस्य
शितल राजकुमार वाघमारे - सदस्य
रोहिणी खंडू बोडके - सदस्य
महेश पंडीत चौधरी - सदस्य
दिपक दादाराव नागरे - सदस्य
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0