सानगडी येथील पेट्रोल पंप कर्मचारी वैभव बांगरे ह्याची उर्मट वागणूक.! ग्राहकांशी सतत गैरवर्तन - नागरिकांमध्ये तीव्र संताप...

Apr 16, 2026 - 10:14
 0
सानगडी येथील पेट्रोल पंप कर्मचारी वैभव बांगरे ह्याची उर्मट वागणूक.! ग्राहकांशी सतत गैरवर्तन - नागरिकांमध्ये तीव्र संताप...

 प्रतिनिधी || साहिल रामटेके, भंडारा

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील अशोका पेट्रोलियम पंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या उर्मट व गैरवर्तनामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांशी अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव बांगरे (वय २९, रा. सासरा, ता. साकोली, जि. भंडारा) हा युवक अशोका पेट्रोलियम पंपावर कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. मात्र, तो पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांशी सतत उर्मटपणे बोलणे, अपमानास्पद शब्दांचा वापर करणे, तसेच किरकोळ कारणांवरून वाद घालणे अशा प्रकारचे वर्तन करत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, पेट्रोल भरण्यासाठी साध्या सेवेसाठी आलेल्या लोकांना योग्य वागणूक देण्याऐवजी संबंधित कर्मचारी अनेकदा उद्धटपणे प्रतिसाद देतो. त्यामुळे अनेक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, पंप परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होत असल्याचेही समोर आले आहे.

विशेष म्हणजे, पेट्रोल पंप प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना सातत्याने ग्राहकांशी नम्र, शिस्तबद्ध व सौजन्यपूर्ण वर्तन करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या जात असल्याचे सांगितले जाते. तरीदेखील संबंधित कर्मचारी या सूचनांकडे दुर्लक्ष करून आपली मनमानी व मुजोरी सुरू ठेवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गेल्या काही दिवसांपासून या कर्मचाऱ्याविरोधात अनेक तक्रारी पुढे आल्या असून, स्थानिक नागरिकांनी त्याच्या वर्तनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “ग्राहकांशी अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक खपवून घेतली जाणार नाही,” असा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे.

या प्रकारामुळे “ग्राहक देवो भव” या संकल्पनेला तडा जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अत्यावश्यक सेवेत काम करत असतानाही अशा प्रकारची वागणूक देणे गंभीर बाब मानली जात आहे.

दरम्यान, नागरिकांनी संबंधित कर्मचाऱ्यावर तात्काळ कठोर शिस्तभंगात्मक कारवाई करण्याची मागणी केली असून, अशा प्रकारची मुजोरी भविष्यात पुन्हा घडू नये यासाठी ठोस पावले उचलावीत, अशीही मागणी होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 1
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 1
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी