मोठी बातमी : "४० दिवसांचा कालावधी, ३५ कंपन्यांचे फुटेज आणि अखेर 'तो' धागा सापडला; उत्तर महाळुंगे पोलिसांची मोठी कामगिरी!"
लोकन्याय मराठीसाठी आशिष ढगे पाटील
चाकण (पुणे) : चाकण-महाळुंगे औद्योगिक परिसरातील 'टाईने रिबेल' बीअर कंपनीतून ३६ लाख रुपये किमतीचे १० बीअर स्टोरेज टँक चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. चोरीचा कालावधी ४० दिवसांचा आणि कोणताही ठोस पुरावा नसताना, उत्तर महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने या गुन्ह्याचा छडा लावला आहे. या चोरीचा सूत्रधार खुद्द कंपनीचा 'विश्वासू' कामगारच निघाल्याने खळबळ उडाली आहे.
काय होती घटना?
दि. २०/०२/२०२६ ते ३०/०३/२०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कंपनीतील ३६ लाख रुपये किमतीच्या १० मोठ्या बीअर स्टोरेज टाक्या लंपास केल्या होत्या. चोरीची माहिती तब्बल ४० दिवसांनी मिळाल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते.
अशी केली गुन्ह्याची उकल:
पोलीस उप-आयुक्त श्रीमती श्वेता खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन केल्यानंतर, तपास पथकाने कंबर कसली. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सुमारे ३० ते ३५ कंपन्यांचे ६०० जीबीपेक्षा जास्त सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणातून संशयीत क्रेन आणि ट्रक निश्चित करण्यात आले. यानंतर तांत्रिक तपासात कंपनीचा माजी विश्वासू कामगार प्रसाद राजळे याचे नाव निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेले आरोपी:
या गुन्ह्यात पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह एकूण ६ जणांना अटक केली असून चोरीला गेलेले सर्व १० बीअर स्टोरेज टँक कुदळवाडी (चिखली) आणि मुंब्रा (ठाणे) येथून जप्त केले आहेत. अटकेतील आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१. प्रसाद विनोद राजळे (वय २९, रा. पिरंगुट, ता. मुळशी)
२. चंदन अर्जुन सिंग (वय ३८, रा. कुदळवाडी, चिखली)
३. अली अहमद चौधरी (वय ३२, रा. कुदळवाडी, चिखली)
४. फिरोज असगर अली खान (वय ३८, रा. मोशी)
५. किसनकुमार सुभाषचंद्र गुप्ता (वय २४, रा. कुदळवाडी, चिखली)
६. नियाज मोहम्मद इसराईल (वय ५१, रा. मुंब्रा, ठाणे)
या तपास पथकाची कामगिरी:
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त श्रीमती श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे आणि त्यांच्या तपास पथकातील अंमलदार राजू कोणकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, मंगेश कदम, गणेश गायकवाड, संतोष वायकर, हरी रणदिवे, शुभम खंडागळे, साहिल सांडभोर, मंगेश घोलप आणि समीर महत यांनी केली आहे.
What's Your Reaction?
Like
7
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1