Crime || "चाकण पोलिसांची जबरदस्त कारवाई; 'सराईत मोटार सायकल चोरटा' अखेर गजाआड, ७ मोटारसायकली जप्त!"
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार मोटारसायकल चोरीच्या घटना घडत असल्यामुळे, विशेष गुन्हे शाखेच्या व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आणि सीसीटीव्ही फुटेजची कसून पाहणी करून चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
सराईत आरोपीला बेड्या..
अशोक मधुकर सोनवणे (रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) असे पकडलेल्या सराईत मोटारसायकल चोराचे नाव आहे.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याच्याकडून चाकण उत्तर, चाकण दक्षिण, यवत आणि उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतून चोरलेल्या एकूण ७ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
१.चाकण उत्तर पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. नं. ५८९/२०२६ बी.एन.एस कलम ३०३(२), वाहन क्रमांक: एम.एच.१४ जे.जी.०९८४
२.चाकण उत्तर पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. नं. ६२३/२०२६ बी.एन.एस कलम ३०३(२), वाहन क्रमांक: एम.एच.१२ ई.एस.९३६६
३.चाकण उत्तर पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. नं. ६२०/२०२६ बी.एन.एस कलम ३०३(२), वाहन क्रमांक: एम.एच.१४ ई.डब्ल्यू.७४७१
४.चाकण उत्तर पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. नं. ६१९/२०२६ बी.एन.एस कलम ३०३(२), वाहन क्रमांक: एम.एच.४४ एम.३४१४
५.चाकण दक्षिण पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. नं. ६११/२०२६ बी.एन.एस कलम ३०३(२), वाहन क्रमांक: एम.एच.२३ ए.जी.४४७३
६.यवत पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. नं. १०१६/२०२४ बी.एन.एस कलम ३०३(२), वाहन क्रमांक: एम.एच.४२ ए.जी.५३९६
७.उरुळी कांचन पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. नं. २६१/२०२४ बी.एन.एस कलम ३०३(२), वाहन क्रमांक: एम.एच.१२ आर.क्यू.९३४२
तपाशी अधिकारी व पथक:
सदरची धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-३ मारुती जगताप, सहा. पोलीस आयुक्त चाकण विभाग योगेश रांजनकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाकण उत्तर पोलीस स्टेशन जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण उत्तर पोलीस स्टेशनचे तपाशी अधिकारी पोलीस उप निरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, पोहवा प्रितम ढमढेरे, योगेश कोळेकर, पोशि/महेश कोळी, शिवाजी लोखंडे, अक्षय सांडभोर यांनी केली आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0