Criminal offense || पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट -३ ची धडाकेबाज कारवाई: चिंबळीत हातभट्टीसाठी साठवलेले २५०० लिटर रसायन नष्ट..!

Jun 30, 2026 - 20:38
 0
Criminal offense || पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट -३ ची धडाकेबाज कारवाई: चिंबळीत हातभट्टीसाठी साठवलेले २५०० लिटर रसायन नष्ट..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने अवैध धंद्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत इंद्रायणी नदीकाठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेले तब्बल २५०० लिटर रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे. या कारवाईत १ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २९ जून २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस हवालदार श्रीधन इचके, पोलीस शिपाई निखिल फापाळे आणि दिलीप राठोड हे आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत होते. दरम्यान, हवालदार श्रीधन इचके आणि निखिल फापाळे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार, चिंबळी गावच्या हद्दीतील भूमकर वस्ती येथे इंद्रायणी नदीच्या काठी झाडाझुडपात अवैध दारूभट्टीसाठी रसायन साठवल्याची माहिती मिळाली.

कारवाई आणि गुन्ह्याची नोंद:

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासणी केली असता, तिथे हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रापत ठेवलेले २५०० लिटर रसायन मिळून आले. पोलिसांनी हे सर्व रसायन घटनास्थळीच नष्ट केले. या प्रकरणी पोलिसांनी रोहित प्रताप राठोड (रा. मोई गाव, ता. खेड, जि. पुणे) याच्याविरुद्ध आळंदी पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

​अवैध धंद्यांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी