Crime Report || पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-४ ची धडाकेबाज कारवाई; दोन गावठी कट्ट्यांसह दोन जण जेरबंद..!

Jun 23, 2026 - 20:50
 0
Crime Report || पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-४ ची धडाकेबाज कारवाई; दोन गावठी कट्ट्यांसह दोन जण जेरबंद..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

महाळुंगे इंगळे (चाकण) : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने एका महत्त्वपूर्ण कारवाईत दोन देशी बनावटीचे गावठी कट्टे जप्त करत दोन आरोपींना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ८०,०००/- रुपये इतकी आहे.

नेमकी घटना काय?

​दिनांक २२ जून २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट-४ चे पथक हद्दीत गस्त घालत असताना, पथकातील पोलीस शिपाई वेताळ आणि पोलीस शिपाई खराडे यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की, काही इसम भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी, भामचंद्र शाळेच्या पाठीमागील रोडवर अवैध शस्त्रे बाळगून थांबले आहेत.

मिळालेल्या माहितीची तत्काळ दखल घेत, पथकाने सापळा रचून सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे दोन देशी बनावटीचे गावठी कट्टे मिळून आले.

आरोपींची माहिती:

​१. कमलाकर राजेंद्र साळवे (वय- २० वर्षे, रा. घाटे वस्ती, आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे; मूळ रा. पिंपळगाव खांड, ता. अकोले, जि. अहमदनगर)

२. एक विधीसंघर्षग्रस्त बालक (वय- १६ वर्षे)


कारवाई करणारे पथक:

सदरची यशस्वी कामगिरी गुन्हे शाखा युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक राजाराम लोणकर, पोलीस शिपाई वेताळ, पोलीस शिपाई खराडे आणि पोलीस शिपाई मेरगळ यांचा समावेश होता.

उत्तर महाळुंगे पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या गुन्ह्याप्रकरणी, आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्यांना जप्त केलेल्या मुद्देमालासह उत्तर महाळुंगे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 2
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी