मोठी बातमी: खेड पंचायत समितीवर 'मशाली'चा भगवा! विद्या मोहिते सभापती, तर मंगेश सावंत उपसभापतीपदी बहुमताने निवड..!

आमदार बाबाजी काळे यांचे राजकीय वर्चस्व सिद्ध..

Mar 9, 2026 - 13:20
 0
मोठी बातमी: खेड पंचायत समितीवर 'मशाली'चा भगवा! विद्या मोहिते सभापती, तर मंगेश सावंत उपसभापतीपदी बहुमताने निवड..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

​खेड (पुणे): खेड तालुक्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या खेड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत अखेर महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. या चुरशीच्या लढतीत आमदार बाबाजी काळे यांनी आपली ताकद दाखवून देत राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सभापती पदी विद्या मोहिते तर उपसभापती पदी मंगेश सावंत यांची बहुमताने निवड करण्यात आली.

अटीतटीची लढत: ९ विरुद्ध ७ मतांनी विजय

​सभापती पदासाठी झालेल्या अत्यंत अटीतटीच्या मतदानात विद्या मोहिते यांनी ९ मते मिळवून विजय संपादन केला, तर प्रतिस्पर्धी उमेदवाराला ७ मतांवर समाधान मानावे लागले. २ मतांच्या फरकाने मोहिते यांनी सभापती पदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली. उपसभापती पदी मंगेश सावंत यांची निवड झाल्याने खेड पंचायत समितीवर आता पूर्णपणे 'मशाली'चा झेंडा फडकला आहे.


आमदार ​बाबाजी काळे यांची 'किंगमेकर' भूमिका..

​निवडणुकीच्या रिंगणात दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती. मात्र, आमदार बाबाजी काळे यांनी योग्य रणनीती आखत आपल्या गटाचे संख्याबळ टिकवून ठेवले. या विजयामुळे तालुक्याच्या राजकारणावर आमदार काळे यांची मजबूत पकड असल्याचे अधोरेखित झाले आहे. विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि फटाक्यांची आतिशबाजी करत मोठा जल्लोष केला.

"हा विजय विकासकामांची पावती आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा आहे. आमदार बाबाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तालुक्याचा सर्वांगीण विकास करू," अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सभापती विद्या मोहिते यांनी निवडीनंतर व्यक्त केली.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 1
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी