क्राईम : आळंदीतील 'साई पॅलेस' हॉटेलवर पोलिसांचा छापा; १७ महिलांची सुटका, वेश्याव्यवसाय रॅकेट उघड..!

Feb 13, 2026 - 21:47
 0
क्राईम : आळंदीतील 'साई पॅलेस' हॉटेलवर पोलिसांचा छापा; १७ महिलांची सुटका, वेश्याव्यवसाय रॅकेट उघड..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

पुणे: आळंदी-चऱ्होली रोडवरील हॉटेल साई पॅलेस येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा दिघी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या मोठ्या कारवाईत पोलिसांनी १७ पीडित महिलांची सुटका केली आहे.

घटनेचा तपशील:

ठिकाण: हॉटेल साई पॅलेस, देहू फाटा, आळंदी-चऱ्होली रोड, पुणे.

कारवाई: दिघी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे हा छापा टाकला.

जप्त मुद्देमाल: कारवाईदरम्यान पोलिसांनी ५१,०७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कारवाईची महत्त्वाची माहिती:

​आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होते.

या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.हॉटेलचे मालक आणि चालक सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आरोपींची नावे:

​१) कृष्णा सुरेश पाटील (मॅनेजर)

२) राज मोहन शेट्टी (मॅनेजर)

३) संजय अमीन बावरी

४) साबीर अत्तर अली

५) भरत दत्तात्रय बिराजदार

६) विक्रम हिरा वढ (पाहिजे आरोपी)

७) पद्मलोचन दास (हॉटेल चालक - फरार)

८) अवधुत गाढवे (हॉटेल मालक - फरार)

​पोलीस शिपाई महेश भारत लाडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी