मोठी बातमी : तडीपार आरोपीला चाकणमध्ये पोलिसांनी ठोकल्या बेड्या; आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकार कारवाई..!
तडीपार आरोपीचा सुळसुळाट, आठवड्यात भरात दुसरी कारवाई..
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण (पुणे): पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला एक सराईत गुन्हेगार पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करून चाकण परिसरात वावरत असल्याचे समोर आले आहे. चाकण उत्तर पोलिसांनी सापळा रचून या आरोपीला जेरबंद केले असून, त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन महेंद्र घोगरे (वय २८, रा. आंबेडकर नगर, चाकण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (७ मार्च) चाकण उत्तर पोलीस स्टेशनचे पथक हद्दीत गस्त घालत होते. यावेळी गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली की, पुणे जिल्ह्यातून तडीपार असलेला रोहन घोगरे हा चाकण गावच्या हद्दीतील चक्रेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभा आहे.
या माहितीची खातरजमा केल्यानंतर, पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी धाड टाकली. दुपारी २.४५ च्या सुमारास पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने आपल्याकडे तडीपारीचा आदेश रद्द झाल्याचा किंवा निवासस्थानी येण्याचा कोणताही परवाना नसल्याचे कबूल केले.
कायदेशीर कारवाई...
आरोपी रोहन घोगरे याला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने २८ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या आदेशानुसार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६(१)(ब) अन्वये संपूर्ण पुणे जिल्हा हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकार पोलिसांनी त्याच्या विरुद्ध कलम १४२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, पोलीस हवालदार यादव, कोळकर, पोलीस शिपाई लोखंडे, जगताप आणि कोळी यांच्या पथकाने केली आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0