Boy Murder Story || ३ वर्षांच्या चिमुकल्याचा 'बळी' घेणारा नराधम जेरबंद! 'लोकन्याय'चा कडाडून सवाल: पैशांसाठी कोणालाही घरं देणार का? पोलिसांचा आता 'ठोक' निर्णय.!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
महाळुंगे इंगळे(चाकण) : औद्योगिक पट्ट्यातील खालुंब्रे (ता. खेड) येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका परप्रांतीय नराधमाने केवळ ३ वर्षांच्या चिमुकल्याचे लैंगिक शोषण करून त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, महाळुंगे पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, १ मे २०२६ रोजी दुपारी खालुंब्रे येथील एका भाड्याच्या खोलीत हा धक्कादायक प्रकार घडला. खेळायला गेलेला ३ वर्षांचा मुलगा बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता, शेजारीच राहणाऱ्या अल्पवयीन याच्या खोलीतील सुटकेसमध्ये त्या चिमुकल्याचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला. नराधम आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने बालकाच्या गळ्यावर वार करून त्याचा जीव घेतला.
घरमालकांनो सावधान! पोलिसांचा कारवाईचा बडगा..
चाकण आणि खालुंब्रे परिसरात सध्या परप्रांतीयांची मोठी गर्दी वाढली आहे. मात्र, अनेक घरमालक केवळ 'भाड्याच्या पैशांसाठी' कोणत्याही कागदपत्रांशिवाय आणि शहानिशा न करता अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आपल्या घरात थारा देत आहेत.
आता महाळुंगे पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की:
• आपल्या खोलीत राहणाऱ्या प्रत्येक भाडेकरूची संपूर्ण माहिती आणि कागदपत्रे स्थानिक पोलीस स्टेशनला कळवणे बंधनकारक आहे.
• ज्या घरमालकांनी माहिती लपवून ठेवली आहे किंवा ज्यांच्याकडे भाडेकरूंची नोंद नाही, अशा घरमालकांवर आता कठोर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून महाळुंगे पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपी सत्यम कुमार याला अटक केली आहे. त्याच्यावर खुनाचा आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0