Chakan Update || चाकण पोलिसांची मोठी कारवाई: गॅस टँकरमधून अवैध गॅस भरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त..

Mar 31, 2026 - 22:59
 0
Chakan Update || चाकण पोलिसांची मोठी कारवाई: गॅस टँकरमधून अवैध गॅस भरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त..

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण: सध्या परिसरात घरगुती गॅसची मोठी टंचाई जाणवत असतानाच, या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन लोकांच्या जीविताशी खेळणाऱ्या एका टोळीवर चाकण उत्तर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीस पथकाची धाडसी कारवाई

चाकण उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे यांना खास बातमीदाराकडून माहिती मिळाली की, भोस गावच्या हद्दीत गॅस टँकरमधून अवैधपणे गॅस रिफिलिंग सुरू आहे. त्यांनी तत्काळ ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून छापा टाकण्यात आला.

या कारवाईत सहभागी असलेले पोलीस पथक:

• ​वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण उत्तर पोलीस स्टेशन

• ​पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, ​

• पो.हवा.यादव,​पो.हवा. प्रितम ढमढेरे,​पो.हवा. कोळेकर,पो.शि. कोळी,​पो.शि. जगताप.

काय घडले घटनास्थळी?

​३१/०३/२०२६ रोजी पहाटे ४:४० वाजता पोलिसांनी मौजे भोस गावच्या हद्दीत, चाकण-शिक्रापूर रोडवरील इंडेन कंपनीच्या पार्किंगमध्ये छापा टाकला. यावेळी एम.एच.०४ एम.एच.७७८७ या गॅस टँकरचे आउटलेट सील तोडून, कोणत्याही सुरक्षा उपकरणांशिवाय अत्यंत धोकादायक पद्धतीने घरगुती गॅस सिलिंडर भरण्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांचा जीव धोक्यात घालून ही गॅस चोरी केली जात होती.

आरोपी आणि जप्त मुद्देमाल..

याप्रकरणी पोलिसांनी खालील तिघांना अटक केली आहे:

१. अंबादास रोहिदास गाडे (वय ४२, रा. चेंबूर, मुंबई)

२. अक्षय रमेश मुंगसे (वय २५, रा. रासे, ता. खेड)

३. नवनाथ अंकुश होजगे (वय ३४, रा. भोस, ता. खेड)

• ​जप्त मुद्देमाल: गॅस टँकर, साहित्य आणि गॅससह एकूण ४९,५७,६०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.

तात्काळ ​गुन्हा दाखल..

आरोपींविरुद्ध चाकण उत्तर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. २८९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) आणि जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गॅस टंचाईच्या काळात पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 5
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 1
Sad Sad 1
Wow Wow 1
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी