राजकीय : खराबवाडी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक: वॉर्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर..

Jun 12, 2026 - 16:18
Jun 12, 2026 - 16:31
 0
राजकीय : खराबवाडी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक: वॉर्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर..

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : खेड तालुक्यातील खराबवाडी ग्रामपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आज वॉर्डनिहाय आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. यामध्ये विविध प्रवर्गांसाठी नियमानुसार आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

वॉर्डनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे आहे:

वॉर्ड १: SC (पुरुष), OBC (जनरल), Open (स्त्री)

वॉर्ड २: SC (स्त्री), ST (जनरल), Open (स्त्री)

वॉर्ड ३: SC (स्त्री), Open (जनरल)

वॉर्ड ४: OBC (स्त्री), Open (स्त्री), Open (पुरुष)

वॉर्ड ५: OBC (जनरल), Open (स्त्री), Open (पुरुष)

वॉर्ड ६: OBC (स्त्री), Open (स्त्री), Open(पुरुष)

एकूण जागांचे आरक्षण:

एकूण जागांमध्ये SC साठी ३, ST साठी १, OBC साठी ४(२ महिलासाठी )आणि Open (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी ९ जागा (ज्यामध्ये ५ जागा महिलांसाठी) निश्चित करण्यात आल्या आहेत.


आरक्षण सोडत प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अध्याशी अधिकारी अक्षय पोपरे, ग्रामविकास अधिकारी निलिमा जाधव, तलाठी शाम वाल्हेकर आणि पोलीस पाटील किरण किर्ते उपस्थित होते. याप्रसंगी अजित केसवड, विठ्ठल वरे, विशाल खोपडे, गणपत कड आणि प्रकाश लोहकरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 1
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी