राजकीय : जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे ॲक्शन मोडवर, महाळुंगे-नाणेकरवाडी परिसरात विकासकामांचा धडाका; रस्ते आणि पाणी प्रश्नावर दिला भर..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण (पुणे): खेड तालुक्यातील म्हाळुंगे, नाणेकरवाडी आणि परिसरातील प्रलंबित विकासकामांना आता गती मिळाली आहे. जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे आणि माजी आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील विविध विकासकामांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. प्रामुख्याने रस्ते सुधारणा आणि पाणीपुरवठा योजनांवर यावेळेस विशेष भर देण्यात आला आहे.
पायाभूत सुविधांचे जाळे विनणार: PMRDA अंतर्गत कामे..
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) अंतर्गत या भागात मूलभूत सुविधांचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये हुंदाई चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली होती, ज्याच्या नूतनीकरणाचे काम आता सुरू झाले आहे. तसेच, खालुंब्रे ते फेज १ या ७५० मीटर अंतराच्या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात येत आहे. या कामामुळे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या, जड वाहतूक, स्थानिक शेतकरी आणि नागरिक यांचा प्रवास आता अधिक सुखकर आणि सुरक्षित होणार आहे.
नारळ फोडून कामाचा शुभारंभ..
शनिवारी सकाळी १० वाजता खालुंब्रे चौकात जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे आणि पंचायत समिती सदस्या अश्विनीताई तरस यांच्या हस्ते विधिवत नारळ फोडून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी 'बोले तैसा चाले' या उक्तीप्रमाणे लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
'जल जीवन मिशन'चा आढावा आणि लोकार्पण..
केवळ रस्तेच नव्हे तर पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठीही गणेश बोत्रे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी 'जल जीवन मिशन' अंतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. "काही ठिकाणी कामे अंतिम टप्प्यात असून, येत्या ४-५ दिवसांत खालुंब्रे येथील पाणीपुरवठा योजनेचेही लोकार्पण करण्यात येईल," अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच संबंधित ठेकेदारांना कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे आदेशही दिले.
मान्यवरांची उपस्थिती...
या सोहळ्याप्रसंगी परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये: सौ. अश्विनीताई तरस, माजी सरपंच सौ. शोभाताई गाडे, सौ. सुप्रियाताई बोत्रे, भास्करभाऊ तुळवे, बाळासाहेब गाडे, संदीपभाऊ बोत्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रंजीतशेठ गाडे, अविनाश बोत्रे, तुषार पवार, समीर पवार, राजू बोत्रे, लखन पवार, विजय बोत्रे, जोपाशेठ बोत्रे, कृष्णा बोत्रे, अनिकेत गाडे, सचिन बोत्रे, मनोज बोत्रे, नितीन गाडे, सुधीर गाडे, श्रीकांत बोत्रे, प्रवीण बोत्रे, शंकर बोत्रे, समीर पवार, राहुल भालेकर, शिवाजी बोत्रे, श्याम काळे, श्याम पवार, प्रथमेश तावरे, अनिकेत तावरे, संकेत तावरे, राहुल पवार, दत्तात्रय बोत्रे, सुप्रिया बोत्रे, दिलीप बोत्रे, भीमसेन पवार, सचिन बोत्रे यांसह गावातील सर्व आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्ते आणि पाण्याचे गंभीर प्रश्न मार्गी लागत असल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.
What's Your Reaction?
Like
6
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0