Thieves arrested || चाकण पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक! पी.एम. आवास योजनेतील ३१ लाखांच्या प्लेट्स चोरणारी टोळी गजाआड..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण (पुणे): चाकण नगरपरिषद हद्दीतील राक्षेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या बांधकाम साईटवर डल्ला मारणाऱ्या आंतरराज्य टोळीचा उत्तर चाकण पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने पर्दाफाश केला आहे. २१० घरांच्या प्रकल्पासाठी आणलेल्या तब्बल ३१ लाख १० हजार रुपये किमतीच्या ॲल्युमिनीयम सेंट्रिंग प्लेट्स आणि वाहने जप्त करण्यात आली आहेत.

नेमकी घटना काय?
राक्षेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेचे काम सुरू आहे. १० एप्रिल ते १६ एप्रिल २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी बांधकाम साईटवरून २० लाख रुपये किमतीच्या २८० स्क्वेअर मीटर ॲल्युमिनीयम प्लेट्स चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी १८ एप्रिल रोजी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. ३४०/२०२६) दाखल करण्यात आला होता.
असा लागला चोरट्यांचा छडा..
तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळ परिसरात एक बेवारस मोटारसायकल मिळून आली. तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला आणि येलवाडी (ता. खेड) येथून मुख्य चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून चोरीचा माल विकत घेणाऱ्या आणखी ३ आरोपींचा शोध लावून एकूण ३१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अटकेतील मुख्य आरोपी:
• रामरक्षा उर्फ राजू धर्मराज पासवान (वय ४०, रा. सुसगाव)
• स्वराज शांताराम कालापाड (वय २३, रा. येलवाडी).
• स्वप्नील शांताराम कालापाड (वय २५, रा. येलवाडी).
• अक्रम रफिकउल्ला खान (वय २८, रा. उत्तर प्रदेश).
कामगिरी करणारे उत्तर चाकण पोलीस पथक..
ही धडाकेबाज कारवाई पोलीस उप-आयुक्त मारुती जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली.
तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी:
पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनोद पाटील, पोलीस उप-निरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, पोलीस हवालदार यादव , प्रितम ढमढेरे, कोळेकर, पोलीस शिपाई कोळी,लोखंडे आणि जगझाप
या यशस्वी कामगिरीमुळे परिसरात उत्तर चाकण पोलिसांचे मोठे कौतुक होत आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0