मोठी बातमी : "आधी मैत्री, मग शारीरिक संबंध अन् शेवटी ३० लाखांची 'धमकी'; वाकी बुद्रुकच्या तरुणाची पोलिसांत धाव"
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण: शारीरिक संबंधाची तक्रार न करण्यासाठी एका तरुणाकडे ३० लाख रुपये आणि फ्लॅटची मागणी करत, त्याला ब्लॅकमेल करणाऱ्या एका ४७ वर्षीय महिलेविरुद्ध उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय फिर्यादी तरुण व आरोपी महिला कल्पना मारुती गाडे (वय ४७, रा. भोसरी) यांच्यात २०१२ पासून ओळख होती. या काळात त्यांच्यात असलेल्या शारीरिक संबंधाबाबत कुठेही वाच्यता न करण्यासाठी आणि तक्रार न करण्यासाठी आरोपी महिलेने फिर्यादी तरुणांकडे वारंवार पैशांची मागणी केली.
हॉटेलमध्ये बोलावून धमकावले
दिनांक २४/०१/२०२६ रोजी आरोपीने फिर्यादी तरुण आणि त्याच्या नातेवाईकांना चाकण येथील हॉटेलमध्ये बोलावले. तिथे तिने "मला ३० लाख रुपये आणि एक फ्लॅट दे, नाहीतर तुझ्यावर बलात्काराची केस करीन," अशी धमकी दिली.
लाखांची रोकड स्वीकारली..
धमकीला घाबरून फिर्यादीने त्याच दिवशी ९९,००० रुपये यूपीआय (UPI) द्वारे आणि ५,०१,००० रुपये रोख, असे एकूण ६ लाख रुपये आरोपी महिलेला दिले. मात्र, उर्वरित रक्कम आठ दिवसांत न दिल्यास पुन्हा खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याने अखेर फिर्यादी तरुण यांनी पोलिसांत धाव घेतली.
पोलिस कारवाई:
याप्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी बी.एन.एस. कलम ३०८(१), (२), (३) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
1
Love
1
Funny
0
Angry
2
Sad
2
Wow
0