मोठी बातमी : खराबवाडीत विकृतीचा कळस! चिमुरड्यांशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधमाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल..!

Mar 1, 2026 - 23:26
Mar 2, 2026 - 00:00
 0
मोठी बातमी : खराबवाडीत विकृतीचा कळस! चिमुरड्यांशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधमाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

​चाकण (पुणे): समाजाला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना खेड तालुक्यातील खराबवाडी येथे उघडकीस आली आहे. दोन अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करून त्यांचा विनयभंग करणाऱ्या एका नराधमाविरुद्ध उत्तर महाळुंगे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नेमकी घटना काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १०:४५ ते ११:०० च्या सुमारास खराबवाडी गावातील एका इमारतीखाली घडली. पीडित दोन चिमुरड्या इमारतीखाली उभ्या असलेल्या रिक्षाच्या मागील सीटवर खेळत होत्या. याच वेळी आरोपी अक्षय खोपडे तिथे आला. त्याने खेळणाऱ्या लहान मुलींपैकी एका मुलीला जबरदस्तीने मांडीवर बसवून तिचे अश्लील मुके घेतले.

​एवढ्यावरच हा नराधम थांबला नाही, तर पार्किंगमध्ये घेऊन जातो असे सांगून त्याने दुसऱ्या मुलीलाही गाठले. इमारतीच्या जिन्यात तिला जवळ ओढून मिठी मारली आणि तिच्याशी अत्यंत घृणास्पद कृत्य केले.

जीवे मारण्याची धमकी आणि तक्रार..

​दोन्ही मुली अल्पवयीन आहेत हे माहित असतानाही आरोपीने हे कृत्य केले. इतकेच नाही तर, "पोलीस तक्रार केली तर कोणालाही जिवंत सोडणार नाही," अशी धमकी देऊन त्याने अश्लील शिवीगाळही केली. मात्र, पीडित कुटुंबीयांनी न डगमगता या विकृत कृत्याविरुद्ध पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांची कडक कारवाई

या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलिसांनी आरोपी अक्षय खोपडे याच्यावर खालील कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे:

• ​बीएनएस (BNS): कलम ७४, ७५(१), ३५१(२), ३५२.

• ​पोक्सो (POCSO): कलम १२.

प्रतिक्रिया : 

लहान मुले आपल्या समाजात सर्वात सुरक्षित असायला हवीत, पण अशा घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा नराधमांना कठोर शिक्षा मिळणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात कोणाचीही अशी हिंमत होणार नाही.

-नागरिक

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 1
Love Love 0
Funny Funny 1
Angry Angry 6
Sad Sad 3
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी