अड्याळमध्ये बुद्ध जयंती उत्साहात.! भव्य रॅलीत नागरिकांचा मोठा सहभाग || सामाजिक एकतेचे दर्शन...

May 2, 2026 - 09:46
 0
अड्याळमध्ये बुद्ध जयंती उत्साहात.! भव्य रॅलीत नागरिकांचा मोठा सहभाग || सामाजिक एकतेचे दर्शन...

 प्रतिनिधी - नितीन वरगंटीवार, पवनी

अड्याळ / भंडारा :

सामाजिक एकतेचे जिवंत उदाहरण ठरलेल्या अड्याळ नगरीत बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने स्थानिक वैशाली बुद्ध विहार येथून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

रॅलीने गावातील विविध मार्गांनी भ्रमण करत रमाई बौद्ध विहार येथे आगमन केले. येथे भगवान बुद्धांची भावपूर्ण पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचली, जिथे शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मेणबत्त्या प्रज्वलित करत अभिवादन करण्यात आले.


यानंतर रॅलीने बाजारपेठेतील प्रमुख मार्गांनी फेरी मारत पुन्हा वैशाली बुद्ध विहार येथे समारोप केला. या संपूर्ण सोहळ्यात सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन सहभाग घेतला, ज्यामुळे सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा सुंदर संदेश देण्यात आला.

कोणताही सण असो, अड्याळमध्ये तो सर्वांनी एकोप्याने आणि उत्साहात साजरा केला जातो, ही परंपरा या कार्यक्रमातून पुन्हा अधोरेखित झाली. सामाजिक एकतेचे दर्शन घडविणारा हा सोहळा परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.


What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी