Chakan Political || पाणी आणि कचरा प्रश्नी जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे आक्रमक; नाणेकरवाडी-महाळुंगे गटाचा घेतला आढावा..!

Mar 30, 2026 - 17:55
Mar 30, 2026 - 18:24
 0
Chakan Political || पाणी आणि कचरा प्रश्नी जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे आक्रमक; नाणेकरवाडी-महाळुंगे गटाचा घेतला आढावा..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : नाणेकरवाडी-महाळुंगे जिल्हा परिषद गटातील गावांना उन्हाळ्याच्या झळा सोसाव्या लागू नयेत, यासाठी जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गटातील सांगुर्डी, येलवाडी, खालुम्ब्रे, खराबवाडी, वासुली आणि सावरदरी या गावांमधील पाणी टंचाई आणि कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष ग्रामपंचायतींना भेटी देऊन आढावा बैठक घेतली.


पाणी नियोजनात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!

सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (MJP) पाणी काही ठराविक भागातच मिळत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर गणेश बोत्रे यांनी स्पष्ट बजावले की, "पाण्याचे सुयोग्य नियोजन करा, यात कोणीही हलगर्जीपणा केल्यास किंवा नागरिकांना वेठीस धरल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.


विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी:

खराबवाडी येथे MJP अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या टाकीच्या कामाची त्यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.


कचरा प्रश्नावर तातडीच्या उपाययोजना करा..

पाण्यासोबतच गावागावांत कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर तातडीने काय उपाययोजना करता येतील आणि नियोजित प्रकल्प कसे राबवता येतील, यावर संबंधित ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.


प्रतिक्रिया : 

​"उन्हाळा सुरू झाला असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, ही आमची प्राथमिकता आहे. सध्या काही ठिकाणी पाणी नियोजनाचा अभाव दिसत आहे. मी स्पष्ट सांगू इच्छितो की, जर कोणीही पाणी वाटपात राजकारण किंवा हलगर्जीपणा करत असेल, तर त्यांच्या विरोधात कडक पाऊले उचलली जातील. प्रशासनाने आणि ग्रामपंचायतींनी समन्वयाने काम करून शेवटच्या घरापर्यंत पाणी पोहोचवावे. कचरा व्यवस्थापनाचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा असून, त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."

-जि. प. सदस्य गणेश बोत्रे 

​यावेळी विविध गावांमधील ग्रामपंचायत पदाधिकारी, शासकीय अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 10
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी