Child Abuse || पुणे जिल्ह्यावर नराधमांची सावली! चाकणमध्ये चिमुरडीला गाठलं, पण 'ती' नडली अन् नराधम मिश्राचा 'गेम' झाला!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी: आशिष ढगे पाटील
चाकण (पुणे): पुणे जिल्ह्यात अत्याचार आणि खुनाच्या भीषण घटनांचे सत्र सुरू असतानाच, चाकण परिसरातील बिरदवडी येथे एका ११ वर्षीय चिमुरडीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, उत्तर चाकण पोलिसांनी तातडीने पावले उचलत नराधम परप्रांतीय आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पीडित ११ वर्षीय मुलगी आपल्या राहत्या घरी होती. घरात कोणीही नसल्याने ती घराला कुलूप लावून जवळच राहणाऱ्या आपल्या काकांच्या घरी जाण्यासाठी निघाली होती. मुलगी एकटी असल्याचे पाहून दबा धरून बसलेल्या नराधम आरोपीने घराच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश केला आणि मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
मुलीच्या धाडसामुळे अनर्थ टळला..
आरोपीने छेडछाड सुरू करताच घाबरून न जाता पीडित मुलीने प्रसंगावधान राखले आणि तिथून पळ काढला. मुलीच्या या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला. घरी आल्यावर पीडितेने घडलेला सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. मुलीची आपबिती ऐकताच वडिलांनी थेट पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांची तत्परता: आरोपी अटकेत..
पुणे जिल्ह्यात आधीच गुन्हेगारीच्या घटनांमुळे तणावाचे वातावरण असताना, चाकण पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपास चक्रे फिरवली. अरुण गयाप्रसाद मिश्रा (वय ३२, मूळचा परप्रांतीय) या नराधमाला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत.
कारवाईचा बडगा:
आरोपी विरुद्ध उत्तर चाकण पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
नागरिकांमध्ये संतापाची लाट
सलग घडणाऱ्या अशा घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः परप्रांतीय गुन्हेगारांकडून होणाऱ्या अशा कृत्यांमुळे बिरदवडी आणि चाकण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा नराधमांना कठोर शासन करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
1
Wow
0