क्राईम : खेड तालुक्यात शेतजमिनीच्या वादातून वृद्ध शेतकऱ्याची हत्या; पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल..

Mar 4, 2026 - 15:44
 0
क्राईम : खेड तालुक्यात शेतजमिनीच्या वादातून वृद्ध शेतकऱ्याची हत्या; पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल..

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

​राजगुरुनगर: खेड तालुक्यातील भांबुरवाडी येथे शेतजमिनीच्या वादातून एका वृद्ध शेतकरी दांपत्याला पाच जणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सोपान तुकाराम भांबुरे (वय ७५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (३ मार्च २०२६) दुपारी ३:४५ वाजण्याच्या सुमारास भांबुरवाडी येथील 'दरा' नावाच्या शेतात घडली. सोपान भांबुरे आणि त्यांच्या पत्नी चंद्रकला भांबुरे (वय ५८) शेतात असताना, त्यांचा मुलगा रामदास शेतातून गहू घरी नेण्यासाठी गेला होता.

त्याचवेळी आरोपींनी संगनमत करून शेतात प्रवेश केला आणि "तुम्ही या शेतात यायचे नाही" असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर पुढे हिंसक हाणामारीत झाले.

अमानुष मारहाण आणि मृत्यू..

​आरोपींनी सोपान भांबुरे आणि चंद्रकला भांबुरे यांना हाताने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. सोपान भांबुरे जमिनीवर कोसळल्यानंतरही आरोपींनी त्यांच्या छातीवर लाथा-बुक्क्यांनी प्रहार केले. या मारहाणीमुळे सोपान यांना चक्कर आली आणि ते गंभीर जखमी झाले.

​त्यांना तातडीने प्रथम धन्वंतरी हॉस्पिटल (राक्षेवाडी) आणि त्यानंतर राजगुरुनगर येथील गावडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

पाच जणांवर खुनाचा गुन्हा..

​याप्रकरणी मृताच्या पत्नी चंद्रकला भांबुरे यांनी राजगुरुनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खालील पाच आरोपींविरुद्ध भादंवि कलम १०३ (१) (खून) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे:

१. शिवाजी पांडुरंग भांबुरे

२. किरण शिवाजी भांबुरे

३. आशा सुभाष भांबुरे

४. सोनाली किरण भांबुरे

५. अरुणा शिवाजी भांबुरे

(सर्व रा. ढोरे भांबुरवाडी, ता. खेड)

​राजगुरुनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिसोदे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 1
Sad Sad 1
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी