क्राईम : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कारवाई; बसमधील प्रवाशांना लुटणाऱ्या ६ महिला जेरबंद..!

Mar 23, 2026 - 19:41
 0
क्राईम : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कारवाई; बसमधील प्रवाशांना लुटणाऱ्या ६ महिला जेरबंद..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

​पिंपरी (प्रतिनिधी): बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या एका आंतरजिल्हा महिला टोळीचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट ३ ने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ६ महिला आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ८९,५०० रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

अशी झाली कारवाई..

​भोसरी MIDC पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट- ३ कडून सुरू होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण केले. तपासादरम्यान, जातेगाव खुर्द (ता. शिरूर) येथील बाजीराव मासळकर यांच्या चाळीत काही संशयित महिला राहत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली.

​मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने महिला सहाय्यक कक्षाच्या मदतीने सदर ठिकाणी छापा टाकला आणि ६ संशयित महिलांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेल्या महिला आरोपी:

१. अनुराधा उर्फ पार्वती मंगेश बुद्धिनाथ (वय ३०)

२. अंजली राम बुद्धिनाथ (वय २१)

३. राधा चरण वैद (वय २१)

४. कल्पना बाला वैद (वय २१)

५. श्वेता उमर (वय २१)

६. जानकी अनिल (वय ३०)

(सर्व राहणार: जातेगाव खुर्द, शिक्रापूर; मूळ रा. मुकुंदवाडी, छत्रपती संभाजी नगर)

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:

​पोलिसांनी आरोपींकडून एकूण ८९,५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे, ज्यामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे:

• ​सोन्याचे मणी: ४५,००० रुपये किमतीचे (अंदाजे ९ ग्रॅम).

• ​चांदीचे पैंजण: १२,००० रुपये किमतीचे (३ जोड, प्रत्येकी १०० ग्रॅम).

• ​रोख रक्कम: ३२,००० रुपये.

• ​इतर: ५०० रुपयांचे चांदीचे जोडवे आणि चोरीसाठी वापरले जाणारे ३ कटर.

या ​तपास पथकांची कौतुकास्पद कारवाई...

सदर यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक जावळे, तसेच अंमलदार बाबा गर्जे, सोमनाथ बोराडे, ऋषिकेश भोसरे, सागर सूर्यवंशी, श्रीधन इचके, मनोज साबळे, गोनटे, स्वप्नील महाले, शशिकांत नांगरे, तुषार वराडे, समीर काळे, सुंदर थोरात, निखिल फापाळे आणि इघारे यांनी केली आहे. या कारवाईत महिला सहाय्यक कक्षाच्या मसपोनी गोडबोले, मपोहवा सोनवणे व मपोशी भोर यांचेही सहकार्य लाभले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी