घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश - १ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त - चोरटा जेरबंद.! लाखांदूर पोलिसांची कारवाई...

Jul 24, 2026 - 11:42
 0
घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश - १ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त - चोरटा जेरबंद.! लाखांदूर पोलिसांची कारवाई...

प्रतिनिधी -  नितीन वरगंटीवार - भंडारा

लाखांदूर पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी करणाऱ्या अज्ञाताचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत पोलिसांनी एका सराईत चोरास बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी चोराकडून तब्बल १ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पंकज नामदेव काळसर्पे (वय ३६, रा. महागाव, ता. अर्जुनी/मोर, जि. गोंदिया, सध्या रा. हरदोली, ता. लाखांदूर) असे लाखांदूर पोलीसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिस सुञानुसार, फिर्यादी जितेंद्र कुंडलीक ठाकरे (वय ३१, रा. मडेघाट, ता. लाखांदूर) यांनी १८ जुलै रोजी पोलीस ठाण्यात तोडी रिपोर्ट दिला होता. १६ जुलै रोजी सकाळी ९ वाजता फिर्यादी व त्यांची कुटुंबीय घराला कुलूप लावून शेतात कामासाठी गेले होते. दुपारी साडेतीन वाजता ते घरी परतले असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप उघडून अज्ञात चोरट्याने घरातील गोदरेजची अलमारी फोडल्याचे निदर्शनास आले. अलमारीमधील रोख २ हजार रुपयांसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ४९ हजार ६६० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी लाखांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

गुन्ह्याचा गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी अज्ञात आरोपीचा कसून शोध सुरू केला. 

तपासादरम्यान पंकज नामदेव काळसर्पे (वय ३६, रा. महागाव, ता. अर्जुनी/मोर, जि. गोंदिया, सध्या रा. हरदोली, ता. लाखांदूर) या संशयिताला २१ जुलै २०२६ रोजी अटक करण्यात आली.
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने चोरी केलेले सोन्याचे दागिने कोंडा-कोसरा येथील बाबाजी मस्के ज्वेलर्स येथे विक्री केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सराफाकडून सोन्याची लग्गड आणि चांदीचे जोडवे जप्त केले.


आरोपीस लाखांदूर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला २४ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली. पोलीस कोठडीदरम्यान करण्यात आलेल्या सखोल चौकशीत आरोपीकडून आणखी चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला. यामध्ये सोन्याची पिटीव मणी (२० नग) किमती १३ हजार रुपये, हिरो प्लेझर स्कुटी (क्र. एम एच ३१ डि डब्लेयु ८४८९) किमती ४५ हजार रुपये व हिरो होंडा पॅशन प्लस मोटारसायकल (क्र. एम एच ३१ सी यु ८७५) किमती ५५ हजार रुपये असा एकूण १ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक नुरल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती ज्योतिका इंगळे, पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गंद्रे यांच्या मार्गदर्शनखाली पार पडली. पोलीस हवालदार संतोष चव्हाण यांनी आपल्या सहकारी पोलीस अंमलदार ओंकार सपाटे, लंकेश राऊत, अमित उईके आणि निलेश चव्हाण यांच्या सहकार्याने ही यशस्वी कारवाई पूर्ण केली. लाखांदूर पोलिसांच्या या तत्पर कारवाईबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी