Koyta Brand || 'कोयता' ब्रँडिंग पडलं महागात! सोशल मीडियावर हवा करणारा 'भाई' गुन्हे शाखा युनिट -३ पोलिसांच्या जाळ्यात..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : सोशल मीडियावर शस्त्रांसह फोटो पोस्ट करून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध गुन्हे शाखा युनिट-०३ ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. चाकणमधील चक्रेश्वर रोड परिसरात हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याच्या तयारीत असलेल्या एका इसमाला गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले.
नेमकी कारवाई काय?
गुन्हे शाखा युनिट-०३ चे पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक चाकण परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस हवाल्दार श्रीधन इचके आणि ऋषिकेश भोसुरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सोशल मीडियावर कोयत्यासह फोटो व्हायरल करणारा एक तरुण देवेंद्र आयकॉन (चक्रेश्वर रोड) येथे शस्त्र घेऊन थांबला आहे.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करून गुन्हे शाखा युनिट-०३ च्या पथकाने तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली आणि संशयित इसमाला कोयत्यासह रंगेहात पकडले.
कारवाई करणारे पथक:
पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली:
पोहवा: श्रीधन इचके,पोहवा: ऋषिकेश भोसुरे, पोहवा: मनोज साबळे, पोशि: निखिल फापाळे
नोंदवण्यात आलेले गुन्हे:
आरोपीवर शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ (२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) व १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया चाकण पोलीस ठाण्याचे अंमलदार पार पाडत आहेत.
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-०३ च्या या तत्पर कारवाईमुळे परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, सोशल मीडियावर 'भाईगिरी' करणाऱ्यांना कडक इशारा मिळाला आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
1
Wow
0