Murder Story || राजकीय वर्तुळात खळबळ: आरपीआय नेते अनिल मोरे यांची निर्घृण हत्या; आरोपी फरार..!
अवैध धंदे यातील वाद आणि सरकारी कार्यालयांतील तक्रारींची हत्येला किनार की अजून काही वेगळे कारण?
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
पिंपरी: मोशी येथील देहू फाटा परिसरात आरपीआय (आठवले गट) कामगार आघाडीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिल मोरे यांची अज्ञातांनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी (१३ मे २०२६) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून, या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड आणि चाकण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल मोरे हे मोशी परिसरात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला चढवला. हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत मोरे यांना तातडीने पिंपरी येथील वायसीएम (YCM) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
प्लॉटिंगचा वाद आणि तक्रारींचा धडाका:
अनिल मोरे यांच्या हत्येमागील कारणांचा शोध घेताना पोलिसांसमोर आता अनेक धक्कादायक पदर उलगडत आहेत. अनिल मोरे हे गेल्या काही काळापासून चाकण आणि परिसरातील अनेक प्लॉटिंग व्यावसायिक आणि काही विविध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीशी जवळीक असल्याने त्यांचे आर्थिक हितसंबंध किंवा जमिनीच्या वादातून हा घातपात तर झाला नाही ना? याचीही पोलीस पडताळणी करत आहेत.
तसेच, मोरे हे आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चाकण परिसरातील विविध सरकारी कार्यालयांच्या कारभाराबाबत कमालीचे आक्रमक होते. अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे आणि प्रशासकीय अनियमिततेबाबत त्यांनी वरिष्ठ पातळीवर तक्रारींचा धडाका लावला होता. त्यांच्या या तक्रारींमुळे काही प्रस्थापित गट किंवा अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता होती, त्या रागातून हा हल्ला झाला का? या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत.
कार्यकर्त्यांचे जाळे आणि संशयाची सुई:
मोरे यांचा चाकण, महाळुंगे आणि एमआयडीसी परिसरात मोठा वावर होता. विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणावर महिला कार्यकर्त्या त्यांच्या संपर्कात होत्या. त्यांच्या निर्घृण खुनाच्या मागे नेमकी काय पार्श्वभूमी आहे, हे शोधण्यासाठी पोलीस त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची चौकशी करत आहेत.
उच्च पातळीवरून तपास सुरू:
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्सच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या खुनामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
4
Wow
0