Murder Update || "शेलूगावात रक्ताचा सडा! पतीकडून पत्नीची हत्या, आत्महत्येने संपला संसार; पोलिसांकडून तपास सुरू."

Jun 18, 2026 - 12:11
 0
Murder Update || "शेलूगावात रक्ताचा सडा! पतीकडून पत्नीची हत्या, आत्महत्येने संपला संसार; पोलिसांकडून तपास सुरू."

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

वासुली : उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेलूगाव येथील ठाकरवस्ती येथे एका भीषण घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून पतीने आपल्या ३० वर्षीय पत्नीची हत्या करून, त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १६/०६/२०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजल्यापासून ते १७/०६/२०२६ रोजी सकाळच्या दरम्यान ही घटना घडली. शेलूगाव (ठाकरवस्ती) येथे पिनाबाई रामदास केदारी (वय ३० वर्षे) या महिलेची तिचा पती नवनाथ खेमा केदारी याने हत्या केली. आपल्या पत्नीला जीवे मारल्यानंतर, नवनाथ केदारी याने देखील राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

उत्तर महाळुंगे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी..

या घटनेची माहिती मिळताच उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून दोन खडे आणि एक गिलवर यांसारखे महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत.

​या दुहेरी दुर्दैवी घटनेप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पती-पत्नीमध्ये नेमका असा कोणता वाद होता, ज्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलले गेले, याचे गूढ उकलण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 1
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी