पिंपरी चिंचवड: गुन्हे शाखा युनिट ३ ची मोठी कारवाई; २ लाखांची विनापरवाना विदेशी दारू जप्त...!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
पिंपरी चिंचवड: अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने कंबर कसली आहे. याच मोहिमेअंतर्गत पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने चऱ्होली परिसरात मोठी कारवाई करत सुमारे २,००,४८० रुपये किमतीची विनापरवाना विदेशी दारू आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक १९ मार्च २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ चे पथक चऱ्होली परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दाभाडे सरकार चौक येथे अवैध विदेशी दारूची साठवणूक करून विक्री केली जात आहे. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी या ठिकाणी तात्काळ छापा टाकला आणि मुद्देमाल हस्तगत केला.
तीन आरोपींना अटक; गुजरात कनेक्शन उघड..
या कारवाईत पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत:
१. रामप्रसाद साहेबराव साळुंखे (वय ३३ वर्षे, रा. चऱ्होली खुर्द, ता. खेड, जि. पुणे)
२. तिलक हेमंत पटेल (वय २१ वर्षे, रा. वापी, जि. वलसाड, गुजरात)
३. अनिल राम सुरत यादव (वय २४ वर्षे, रा. वापी, गुजरात)
अटकेतील दोन आरोपी हे थेट गुजरात राज्यातील वापी येथील असल्याने, या अवैध दारू तस्करीचे धागेदोरे आंतरराज्य स्तरावर पसरले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
सदर धडाकेबाज कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाई उपनिरीक्षक जावळे, पोलीस हवादार श्रीधन इचके, सोमनाथ बोराडे, सूर्यवंशी; पोलीस शिपाई शशिकांत नांगरे, समीर काळे, निखिल फापाळे आणि इघारे यांनी केली.
सदर कारवाई जप्त केलेला मुद्देमाल आणि ताब्यात घेतलेले आरोपी पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी दिघी पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. या तस्करीमागे आणखी कोणाचे हात आहेत आणि हे रॅकेट किती मोठे आहे, याचा सखोल तपास दिघी पोलीस स्टेशनचे तपास अंमलदार करत आहेत.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0