लाखांदूरमध्ये बोगस पत्रकारांकडून वसुलीचा गंभीर आरोप.! पत्रकारितेच्या नावाखाली ‘नंगानाच’ सुरू असल्याची चर्चा...
प्रतिनिधी || साहिल रामटेके, भंडारा
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात सध्या बोगस पत्रकारांच्या कारवायांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पत्रकारितेच्या नावाखाली काही व्यक्तींकडून शासकीय यंत्रणांवर दबाव टाकून अवैध वसुली केल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत. या प्रकारामुळे प्रशासनात आणि कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एका खाजगी न्यूज पोर्टलशी संबंधित असलेल्या तथाकथित “न्यूज एडिटर” आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप आहेत. “आम्ही पत्रकार आहोत” असे सांगत शासकीय अधिकारी, डॉक्टर, महसूल विभाग आणि वन विभागातील कर्मचाऱ्यांना धमकावून बातमी लावण्याची भीती दाखवून पैशांची मागणी केली जात असल्याची चर्चा आहे.या प्रकारात संबंधित व्यक्तींकडून शासकीय कर्मचाऱ्यांना वारंवार फोन, प्रत्यक्ष भेटी आणि दबाव टाकून त्रास दिला जात असल्याचेही बोलले जात आहे.
बदनामी करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध करण्याची धमकी देत आर्थिक मागणी केली जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.लाखांदूरमध्ये पत्रकार म्हणून वावरत असलेल्या एका व्यक्तीची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचीही स्थानिक स्तरावर चर्चा आहे. त्याच्यावर अजून काही अतिरिक्त प्रकरणात पूर्वी काही गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जात असून, तरीही तो बिनधास्तपणे या प्रकारात सक्रिय असल्याचे आरोप आहेत.या संपूर्ण प्रकारामुळे भंडारा जिल्ह्यातील प्रामाणिक पत्रकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
काही मोजक्या व्यक्तींमुळे संपूर्ण पत्रकारितेची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. “पत्रकारिता ही सेवा आहे, वसुलीचा धंदा नाही,” अशी ठाम भूमिका अनेक पत्रकारांनी घेतली आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पत्रकारांनी लवकरच पोलीस अधीक्षक (SP) यांच्यासोबत तातडीची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत बोगस पत्रकारांवर कठोर कारवाई, वसुलीच्या प्रकारांची चौकशी आणि पत्रकारितेची प्रतिमा जपण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जाणार आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0