BIG BREAKING : ​‘ऑपरेशन इंद्रायणी’: आळंदी घाटावर दहशत पसरवणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या; कोयते-शस्त्रांचा जखीरा जप्त..!

Jun 13, 2026 - 23:23
 0
BIG BREAKING : ​‘ऑपरेशन इंद्रायणी’: आळंदी घाटावर दहशत पसरवणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या; कोयते-शस्त्रांचा जखीरा जप्त..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

आळंदी: इंद्रायणी नदी घाट परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोन गुन्हेगारांना पुणे क्राईम ब्रँचच्या युनिट ३ ने जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन कोयते, एक सत्तूर आणि एक गुप्ती असा घातक शस्त्रांचा जखीरा जप्त केला असून, या कारवाईमुळे आळंदी परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

आळंदी परिसरातील इंद्रायणी नदी घाटावर काही इसम घातक शस्त्रे बाळगून दहशत पसरवत असल्याची गोपनीय माहिती पोलीस हवालदार श्रीधन इचके आणि पोलीस शिपाई निखिल फापाळे यांना मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँचच्या टीमने सापळा रचला. पोलिसांनी घटनास्थळावरून संशयित दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे कोयते, सत्तूर आणि गुप्ती अशी घातक शस्त्रे आढळून आली.

कोणाची होती कारवाई?

ही धडाकेबाज कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलीस हवालदार श्रीधन इचके, ऋषिकेश भोसुरे आणि पोलीस शिपाई निखिल फापाळे, बाळासाहेब भांगले, समीर काळे यांच्या पथकाने केली.

कायदेशीर कारवाई..

ताब्यात घेतलेल्या आरोपींवर शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ (२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दिघी पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.

ऐन गर्दीच्या गर्दीच्या ठिकाणी नदी घाटावर शस्त्रांसह फिरणाऱ्या या गुन्हेगारांना वेळीच पकडल्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी