ब्रेकिंग: चाकणमध्ये ट्रान्सफॉर्मर चोरांच्या टोळीचा पर्दाफाश; ४८ गुन्ह्यांचा मास्टरमाइंड गजाआड!

May 26, 2026 - 07:14
 0
ब्रेकिंग: चाकणमध्ये ट्रान्सफॉर्मर चोरांच्या टोळीचा पर्दाफाश; ४८ गुन्ह्यांचा मास्टरमाइंड गजाआड!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील काही काळापासून विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरीच्या वाढत्या घटनांनी खळबळ उडाली होती. मात्र, आता चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका सराईत टोळीचा पर्दाफाश केला असून, या टोळीवर राज्यभरात तब्बल ४८ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. 

नेमकी घटना काय?

दिनांक १५ मे ते १६ मे २०२६ या कालावधीत बिरदवडी (ता. खेड) येथील नेक्सस व्हेन्चर्सच्या लेझर कटिंग वर्कशॉपमधून विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरीला गेला होता. याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी १४ मार्च ते १५ मार्च २०२६ दरम्यान कृष्णाई खडी क्रश प्लांटमधील ट्रान्सफॉर्मर चोरीचा गुन्हाही याच टोळीने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

पोलिसांची धडाकेबाज कामगिरी..

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील १०० ते १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी शोध घेऊन अहिल्यानगर येथून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे:

१) प्रदिप राजेंद्र शिंदे (वय २६, रा. चाकण, मूळ गाव: उदापुर, ता. जुन्नर)

२) श्रीकांत शिवाजी जाधव (वय २४, रा. दहीवडी पारुडी, ता. शिरुर)

३) विशाल खंडु पवार (वय २८, रा. वडगाव सावताळ, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर)

टोळीचा मोठा इतिहास..

या आरोपींची चौकशी केली असता, त्यांच्यावर खेड, शिरुर, शिक्रापूर आणि यवत पोलीस स्टेशन अंतर्गत विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरीचे तब्बल ४८ गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या या आरोपींकडून दोन गुन्ह्यांतील चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त मारुती जगताप, सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाली आहे. ​या गुन्ह्याचा यशस्वी तपास पोलीस उप निरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, पोलीस उप निरीक्षक आतिष नरवडे, पोलीस हवालदार ढमढेरे, पोलीस हवालदार कोळेकर, पोलीस शिपाई कोळी,पोलीस शिपाई लोखंडे आणि पोलीस शिपाई जगझाप यांच्या पथकाने केला आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी