मोठी बातमी : तडीपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या महिलेला चाकण उत्तर पोलिसांनी ठोकल्या बेड्या..
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण: पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आलेली महिला आदेशाचा भंग करून आपल्या राहत्या घरी आल्याचे उघड झाले आहे. चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या पथकाने काल (३ मार्च २०२६) दुपारी भोसे गावच्या हद्दीत छापा टाकून या महिलेला अटक केली.
आरोपी : मंजिला उत्तरसीह राठोड (वय ४५, रा. भोसे, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने मंजिला राठोड हिला ०८/०१/२०२५ रोजीच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार केले होते. असे असतानाही, ती कोणत्याही परवानगीशिवाय चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भोसे येथे आपल्या घरी आली असल्याची खात्रीलायक बातमी पोलिसांना मिळाली.
पोलिसांची कारवाई..
बातमी मिळताच चाकण उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार भैरोबा यादव, उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे आणि त्यांच्या पथकाने खासगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना भोसे-काळूस रोडवरील तिच्या घरी धाड टाकली. दुपारी १:१५ च्या सुमारास पोलिसांनी तिला जागीच ताब्यात घेतले. यावेळी तिच्याकडे तडीपारीचा आदेश रद्द झाल्याचे किंवा जिल्ह्यात प्रवेशाचे कोणतेही कायदेशीर कागदपत्र मिळून आले नाही.
तडीपार आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याप्रकरणी मंजिला राठोड विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0