मोठी बातमी : "गुळमिश्रित रसायनाचा 'बाजार' पोलिसांनी उठवला; चिखलीच्या तरुणाचा हातभट्टीचा कारखाना उद्ध्वस्त!"

Feb 28, 2026 - 11:27
Feb 28, 2026 - 12:18
 0
मोठी बातमी : "गुळमिश्रित रसायनाचा 'बाजार' पोलिसांनी उठवला; चिखलीच्या तरुणाचा हातभट्टीचा कारखाना उद्ध्वस्त!"

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

​चाकण (पुणे): चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळुस गावच्या परिसरात भीमा नदीच्या काठावर बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर पोलिसांनी शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) सायंकाळी मोठी कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी सुमारे ७ लाख ५० हजार रुपये किमतीचे दारू तयार करण्याचे कच्चे रसायन जप्त करून नष्ट केले आहे.

नेमकी घटना काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, चाकण उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई सुमीत जगताप आणि त्यांच्या पथकाला बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, काळुस गावच्या हद्दीत भीमा नदीकाठी काही लोक गुळमिश्रित रसायन भिजवून हातभट्टीची दारू तयार करत आहेत. या माहितीची खातरजमा केल्यानंतर, चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोन पंचांसह सायंकाळी ६:१० वाजताच्या सुमारास खाजगी वाहनाने त्या ठिकाणी धाड टाकली.


पाच हजार लिटर रसायन जप्त..

​पोलिसांनी घटनास्थळी पाहिले असता, एक इसम लोखंडी बॅरलखाली जाळ घालून बसलेला आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपले नाव अनिल दिगंबर सीतापुरे (वय ३२, रा. मोरेवस्ती, चिखली) असल्याचे सांगितले.

घटनास्थळी तपासणी केली असता:

• ​साधारण ५,००० लिटर हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित रसायन मिळून आले.

• ​या रसायनाची किंमत प्रति लिटर ५० रुपयांप्रमाणे एकूण ७,५०,००० रुपये इतकी आहे.

• ​पोलिसांनी नमुन्यासाठी काही रसायन बाटलीत भरून घेतले असून, उर्वरित रसायन आणि प्लास्टिकचे ड्रम पंचांसमक्ष जागीच नष्ट केले आहेत.

कायदेशीर कारवाई..

​या प्रकरणी आरोपी अनिल सीतापुरे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (फ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, पोलीस हवालदार प्रीतम ढमढेरे, पोलीस अंमलदार महेश कोळी, शिवा लोखंडे, सुमित जगझाप यांच्यासह चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी