Chakan Crime || नराधम बाप अटकेत! पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दावडमळ्यातील धक्कादायक प्रकार समोर...!

Apr 1, 2026 - 08:05
 0
Chakan Crime || नराधम बाप अटकेत! पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दावडमळ्यातील धक्कादायक प्रकार समोर...!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

​चाकण (पुणे): बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत घृणास्पद घटना चाकणमधील दावडमळा परिसरात उघडकीस आली आहे. पोटच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजेंद्र सुभाष राठोड (वय ३९ वर्षे) असे या नराधम बापाचे नाव आहे.

नेमकं प्रकरण काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, ३० मार्च २०२६ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १२:३० च्या दरम्यान ही घटना घडली. आरोपी राजेंद्र राठोड हा व्यवसायाने ड्रायव्हर असून तो दावडमळा येथील कोहिनूर बिल्डिंगमध्ये कुटुंबासह राहतो. घटनेच्या वेळी पीडित मुलीची आई घरात नसल्याची संधी साधून, आरोपीने आपल्याच अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केला.

पीडितेची हिंमत, पोलिसांची कारवाई..

​या धक्कादायक प्रसंगानंतर पीडित मुलीने घाबरून न जाता थेट पोलीस ठाणे गाठले आणि आपल्या नराधम बापाविरुद्ध तक्रार दिली. चाकण उत्तर पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६५(१), ७४, ७५, ३५१(२) आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या कलम ४, ८, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासाची चक्रे वेगाने फिरली..

• कारवाई करणारे पोलीस : पोलीस हवालदार प्रितम ढमढेरे, योगेश्वर कोळेकर, पोलीस शिपाई महेश कोळी यांनी आरोपीला नाशिक फाटा येथून ताब्यात घेतले.

• ​आरोपीचे नाव: राजेंद्र सुभाष राठोड (वय ३९ वर्षे).

• ​ठिकाण: कोहिनूर बिल्डिंग, दावडमळा, चाकण, ता. खेड.

• ​तपास अधिकारी: स.पो.नि राजेंद्र पवार आणि पो.उप.नि संगीता कदम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

​वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यादृष्टीने पुरावे गोळा केले जात आहेत. रक्षकच भक्षक बनल्याच्या या घटनेमुळे चाकण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 6
Sad Sad 1
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी