Child Murder || धक्कादायक! अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या ६ वर्षांच्या पोटच्या मुलाची आईनेच केली हत्या; फरार प्रियकर महाळुंगे पोलिसांच्या जाळ्यात..!

Apr 19, 2026 - 09:56
 0
Child Murder || धक्कादायक! अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या ६ वर्षांच्या पोटच्या मुलाची आईनेच केली हत्या; फरार प्रियकर महाळुंगे पोलिसांच्या जाळ्यात..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

​महाळुंगे एमआयडीसी(चाकण): अनैतिक संबंधांत अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून स्वतःच्या ६ वर्षांच्या पोटच्या मुलाची आईनेच प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील फरार मुख्य आरोपीला दक्षिण महाळुंगे पोलिसांनी आंध्रप्रदेशापर्यंत पाठलाग करून अखेर बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

​पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दक्षिण महाळुंगे एमआयडीसी परिसरात हा थरार घडला. बसरिन मेहबुब शेख (वय २७) या विवाहित महिलेचे राम विनायक कजेवाड याच्याशी प्रेमसंबंध होते. ही महिला आपला ६ वर्षांचा मुलगा 'आवेज' याला घेऊन मागील चार महिन्यांपासून कुरुळी (ता. खेड) येथे प्रियकरासोबत राहण्यास आली होती.

हृदयविकाराचा बनाव ठरला अपयशी..

​प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या आवेजचा काटा काढण्याचे या दोघांनी संगनमत करून ठरवले. ४ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास, या दोघांनी आवेजचे डोके बाथरूममधील पाण्याच्या बादलीत बुडवून आणि भिंतीवर आपटून त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. हा गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी आवेजचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव रचला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह इर्टिगा कारमधून बीड जिल्ह्यातील परळी येथे घेऊन गेले.

तपासात धक्कादायक सत्य समोर..

​फिर्यादी इसाक शेख यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. शवविच्छेदन अहवाल आणि मुलाच्या शरीरावरील जखमांमुळे आई बसरिन शेख हिची बनावट कथा उघड पडली आणि तिने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी तिला तत्काळ अटक केली होती, मात्र मुख्य आरोपी राम कजेवाड फरार झाला होता.

तिरुपती आणि बीडमध्ये पाठलाग करून अटक..

​दक्षिण महाळुंगे पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नेमली होती. आंध्रप्रदेशातील तिरुपती आणि बीडमध्ये पाठलाग करून अखेर १७ एप्रिल रोजी राम कजेवाडला अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस पथकाची मोठी कारवाई:

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुल्ली आणि त्यांच्या पथकाने फत्ते केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये करत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी