Crime Update || ५५० किमीचा थरारक पाठलाग! चाकणमधील मोठी ज्वेलरी चोरी उघड; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची गुजरात-राजस्थानमध्ये धडाकेबाज कारवाई..!

May 3, 2026 - 00:14
 0
Crime Update || ५५० किमीचा थरारक पाठलाग! चाकणमधील मोठी ज्वेलरी चोरी उघड; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची गुजरात-राजस्थानमध्ये धडाकेबाज कारवाई..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण(पुणे) : चाकण येथील 'श्री खिमत ज्वेलर्स'वर गॅस कटरच्या साहाय्याने दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट ३ ने पर्दाफाश केला आहे. तब्बल ५५० किलोमीटर अंतरावरील सीसीटीव्ही फुटेजचा तांत्रिक मागोवा घेत पोलिसांनी गुजरात आणि राजस्थानमधून ५ सराईत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून ३० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

नेमकी घटना काय?

​काही दिवसांपूर्वी चाकण येथील श्री खिमत ज्वेलर्सचे पाठीमागील शटर आणि लोखंडी ग्रील गॅस कटरने कापून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला होता. चोरट्यांनी दुकानातील सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ७७ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा (रजि. नं. ३५७/२०२६) दाखल करण्यात आला होता.

पाच राज्यांचा प्रवास आणि ५५० किमीचे फुटेज..

​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे एक विशेष पथक तयार करण्यात आले. आरोपींनी अत्यंत चाणाक्षपणे चोरी केली होती, मात्र पोलिसांनी चिकाटी सोडली नाही. पथकाने चाकणपासून थेट गुजरात आणि राजस्थानपर्यंतच्या रस्त्यांवरील सुमारे ५५० किलोमीटरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला आणि त्यांना बेड्या ठोकल्या.

अटक केलेले आरोपी:

​१. पुखराज ओमप्रकाश लोहार (वय २१, रा. राजसमंद, राजस्थान) - व्यवसाय: वेल्डर

२. राधेश्याम भेरुलाला सालवी (वय २२, रा. भिलवाडा, राजस्थान) - व्यवसाय: कलरकाम

३. हिम्मतकुमार रोशनजी सालवी (वय ३७, रा. अहमदाबाद, गुजरात) - व्यवसाय: गॅरेज

४. अजय भेरुलाला सालवी (वय २४, रा. भिलवाडा, राजस्थान)

५. किशन रामलाल सोनी (वय २२, रा. आंबेठाण चौक, चाकण) - हा आरोपी ज्वेलरी शॉपमध्ये कामगार म्हणून कार्यरत होता.

याशिवाय राजू, कालू आणि सुमित नावाच्या अन्य तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

 ३० लाखांचा मुद्देमाल जप्त..

​पोलिसांनी या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

• ​सोने: २०,००० रुपये किमतीचे कर्णफुले, बांगड्या, ब्रासलेट, पेंडाल इत्यादी (२.९०० ग्रॅम).

• ​चांदी: २७,००,००० रुपये किमतीच्या मूर्ती, पैंजण, अंगठी आणि चांदीचा चुरा (१७.८०० कि.ग्रॅम).

• ​वाहन: गुन्ह्यात वापरलेली ३,००,००० रुपये किमतीची मारुती स्विफ्ट कार (GJ01-RG-2925).

• ​एकूण जप्त ऐवज: ३०,२०,००० रुपये.

तपास पथकाची कामगिरी..

​ही यशस्वी कामगिरी गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस हवालदार संदीप सोनवणे, श्रीधन इचके, पोहेका गरजे, समीर काळे, बाळासाहेब भांगले, निखिल फापाळे, शशिकांत नांगरे, सुंदर थोरात, स्वप्नील महाले आणि राजू ईघारे यांच्या पथकाने केली आहे.

​पुढील अधिक तपास गुन्हे शाखा युनिट ३ करत आहे.

What's Your Reaction?

Like Like 8
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 2
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी