क्राईम : दक्षिण महाळुंगे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; ४ दुचाकींसह चोरट्याला अटक, घरफोडीचा गुन्हाही उघड..!

Mar 22, 2026 - 00:08
 0
क्राईम : दक्षिण महाळुंगे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; ४ दुचाकींसह चोरट्याला अटक, घरफोडीचा गुन्हाही उघड..!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

​महाळुंगे : : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. दक्षिण महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका सराईत चोरट्याला अटक करून त्याच्याकडून ४ मोटार सायकली आणि घरफोडीतील सोन्याचे दागिने असा एकूण १,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नेपाळचा रहिवासी अटकेत..

​या कारवाईत पोलिसांनी प्रकाश तेज विश्वकर्मा (वय २० वर्षे, सध्या रा. गणेश मंदिराजवळ, चक्रपाणी वसाहत, भोसरी; मूळ रा. महेंद्र नगर, नेपाळ) याला अटक केली आहे. आरोपीला येरवडा कारागृहातून ताब्यात घेऊन तांत्रिक तपासाच्या आधारे अधिक चौकशी केली असता, त्याने चोरीची कबुली दिली.

जप्त केलेला मुद्देमाल आणि उघड झालेले गुन्हे..

​पोलिसांनी आरोपीकडून एम.आय.डी.सी. परिसरातून चोरलेल्या ४ दुचाकी आणि एका घरफोडीतील दीड ग्रॅम सोन्याचे पदक हस्तगत केले आहे. जप्त केलेल्या वाहनांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

१. दक्षिण महाळुंगे ४५/२०२६ MH 14 FW 4277 यामाहा एफ झेड -३०,०००/-

२. दक्षिण महाळुंगे १३३/२०२६ MH 14 JB 6379 स्प्लेंडर -३५,०००/-

३. दक्षिण महाळुंगे १३८/२०२६ MH 14 BP 1650 होंडा शाईन- ३०,०००/-

४. तळेगाव MIDC २९/२०२५ MH 12 RD 3302 होंडा शाईन- ३५,०००/-

५. दक्षिण महाळुंगे ४३/२०२६ (घरफोडी) - सोन्याचे पदक-२०,०००/-

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पथकाची कामगिरी..

​सदर कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, बसवराज तेली तसेच पोलीस उप आयुक्त श्रीमती श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

​तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली आणि अंमलदार देवराम पाथरी, विश्वास नाणेकर, किशोर सांगळे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांचा समावेश होता.

​या प्रकरणी आरोपीकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून दक्षिण महाळुंगे पोलीस अधिक तपास करत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 1
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 1
Sad Sad 1
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी