Financial Fraud || भैरवनाथ पतसंस्थेचा ६ कोटी ५३ लाखांचा 'महाघोटाळा'; ३६ जणांच्या संचालक टोळीवर उत्तर चाकण पोलिसांत गुन्हा दाखल.!

Apr 16, 2026 - 16:34
Apr 16, 2026 - 17:20
 0
Financial Fraud || भैरवनाथ पतसंस्थेचा ६ कोटी ५३ लाखांचा 'महाघोटाळा'; ३६ जणांच्या संचालक टोळीवर उत्तर चाकण पोलिसांत गुन्हा दाखल.!

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील 'भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत' विश्वासाला काळिमा फासणारा प्रकार समोर आला आहे. गोरगरीब ठेवीदारांच्या घामाचा पैसा सुरक्षित ठेवण्याचे आमिष दाखवून, संस्थेच्या माजी अध्यक्षांपासून ते संचालकांपर्यंत तब्बल ३६ जणांनी संगनमताने ६ कोटी ५३ लाख ९२ हजार ४२ रुपयांचा (₹ ६,५३,९२,०४२/-) महाभ्रष्टाचार केला आहे. याप्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी ३६ जणांच्या टोळीवर गुन्हे दाखल केल्याने संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बड्या धेंडांचा समावेश; ही आहेत प्रमुख नावे:

​१. रामदास हिरामण कड, २. तुकाराम पिराजी टोपे, ३. किसन सोपान गारगोटे, ४. बाळासाहेब पंडित गारगोटे, ५. रवींद्र नामदेव गारगोटे, ६. अनिल गोविंद टोपे, ७. शिवाजी बाबुराव जरे, ८. काळुराम पांडुरंग टोपे, ९. राजाराम किसन टोपे, १०. सुरेश रंगनाथ लोखंडे, ११. दत्तात्रय वाल्मिक गोरे, १२. शांताराम बापू जगताप, १३. विमल बबन गारगोटे, १४. रामदास ज्ञानेश्वर जाधव, १५. गोरख भागुजी टोपे, १६. सुरेखाताई लक्ष्मणराव टोपे, १७. मारुती ज्ञानोबा गारगोटे, १८. राहुल रामदास टोपे, १९. दत्तात्रय संतु टोपे, २०. अंकुश रामदास जरे, २१. निलेश हनुमंत टोपे, २२. सुरेश शिवाजी टोपे, २३. संतोष दत्तात्रय टिपरे, २४. सुरेखा लहू गारगोटे, २५. सुरेखा संजय टोपे, २६. काळुराम लक्ष्मण गारगोटे, २७. शिवाजी दगडू टोपे, २८. सूरज लक्ष्मण टोपे, २९. सुरेखा लक्ष्मण टोपे, ३०. शिवाजी किसन भोंडवे, ३१. सारिका रोहिदास गारगोटे, ३२. रोहिदास तुकाराम गारगोटे, ३३. सुरेखा सुरेश लोखंडे, ३४. अनिता काळुराम गारगोटे, ३५. विशाल दत्तात्रय पवळे, ३६. रामदास संतु टोपे.

अशा प्रकारे लुटले ठेवीदारांना:

​आरोपींनी सत्तेचा माज दाखवत आणि नियमांना हरताळ फासत खालीलप्रमाणे लूट केली:

• बनावट कर्ज वाटप: सोनेतारण, मालमत्ता तारण आणि वैयक्तिक कर्जाच्या नावाखाली बनावट कागदपत्रे तयार करून रक्कम हडपली.

• ​ठेवींचा अपहार: ठेवीदारांनी जमा केलेल्या रकमा बँकेत जमा न करता स्वतःच्या खिशात घातल्या.

• ​रोख शिलकीत फेरफार: बँकेच्या रोजकीर्दीत खोट्या नोंदी करून प्रत्यक्षात रक्कम नसताना ती असल्याचे भासवून ठेवीदारांची दिशाभूल केली.

आरोपींवर ओढले ताशेरे:

​ज्यांच्याकडे ठेवीदारांच्या पैशाचे रक्षण करण्याची जबाबदारी होती, त्यांनीच 'कुंपणाने शेत खावे' या उक्तीप्रमाणे वागणूक दिली आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सामान्यांच्या लग्नाचे, शिक्षणाचे आणि आजारपणाचे साडे सहा कोटी रुपये लाटणाऱ्या या ३६ जणांना कठोर कायदेशीर धडा शिकवणे काळाची गरज आहे. अशा 'आर्थिक नरभक्षकांमुळेच' आज ग्रामीण भागातील सहकार चळवळ धोक्यात आली आहे.

⚠️ ठेवीदारांसाठी धोक्याचा इशारा (सावधान!):

तुमचा पैसा गुंतवताना या गोष्टी लक्षात ठेवा:

१. अवास्तव व्याजाचा मोह टाळा: ज्या संस्था गरजेपेक्षा जास्त व्याज देण्याचे आश्वासन देतात, तिथे धोका असू शकतो.

२. ऑडिट रिपोर्ट तपासा: संस्थेला 'अ' किंवा 'ब' वर्ग आहे का? दरवर्षी ऑडिट होते का? हे पाहणे तुमचा हक्क आहे.

३. संचालकांचे चारित्र्य: केवळ ओळखीवर विश्वास न ठेवता, संस्थेचा कारभार पारदर्शक आहे का याची खात्री करा.

४. संघटित व्हा: जर तुमची फसवणूक झाली असेल, तर गप्प न बसता पोलिसांकडे आणि सहकार निबंधकांकडे तक्रार करा.

तपास यंत्रणा सतर्क: 

उत्तर चाकण पोलिसांनी या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन तपास वेगाने सुरू केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी. कदम पुढील तपास करत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 1
Sad Sad 1
Wow Wow 1
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी