Frod Mony Scame || खेळण्यातील नोटा देऊन कार खरेदी करणाऱ्या टोळीचा चाकण पोलिसांकडून पर्दाफाश; ४२ लाखांच्या बनावट नोटा जप्त..
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण (पुणे): वाहन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात खेळण्यातील बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या एका सराईत टोळीचा चाकण पोलिसांनी अत्यंत कौशल्याने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४२ लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या असून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
बारामती येथील फिर्यादी हुजेब बागवान हे आपल्या मित्राची 'मारुती सुझुकी अल्टो' कार विकण्यासाठी चाकण परिसरात आले होते. आरोपींनी त्यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून गाडी विकत घेण्याचे आमिष दाखवले. दोन्ही बाजूंनी साडेतीन लाख रुपयांत गाडीचा सौदा निश्चित करण्यात आला.
अशी झाली फसवणूक
व्यवहार ठरल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला ३ लाख रुपये रोख दिले आणि गाडी ताब्यात घेऊन तिथून पोबारा केला. मात्र, फिर्यादी बागवान यांनी नोटांची बंडले उघडून तपासली असता त्यांना धक्काच बसला. बंडलच्या वर आणि खाली खऱ्या नोटा लावल्या होत्या, मात्र मध्ये खेळण्यातील बनावट नोटा भरल्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी तातडीने चाकण पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांची वेगवान कारवाई..
घटनेचे गांभीर्य ओळखून चाकण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अवघ्या काही तासांतच तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला आणि त्यांना अटक केली.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. गणेश ज्ञानदेव ठाकरे
२. समीर दिनकर महल्ले
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
• ४२ लाख ५० हजार रुपये किमतीच्या खेळण्यातील बनावट नोटा.
• फसवणूक करून नेलेली अल्टो कार.
• गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल.
• इतर आक्षेपार्ह साहित्य.
सावधानता बाळगण्याचे आवाहन:
रोख रकमेचे मोठे व्यवहार करताना नोटा नीट तपासून घ्याव्यात आणि अनोळखी व्यक्तींसोबत व्यवहार करताना सतर्क राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1