Girl Kidnapping || चाकणला चाललंय तरी काय? अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; आता तरी जागे व्हा!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण(पुणे): औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण आणि परिसरात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. विशेषतः उत्तर चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकामागून एक घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आल्याने मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
नेमकी घटना काय?
उत्तर चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुवर्ण चौक परिसरातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपी सिद्धार्थ एडके (वय २० वर्ष, रा. बीड वस्ती, चाकण) याने लग्नाचे आमिष दाखवून आणि फूस लावून पळवून नेले आहे. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. सपोनि पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
याशिवाय, उत्तर चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांत अशाच प्रकारच्या ३ ते ४ विविध घटना घडल्या आहेत, ज्यामुळे स्थानिक प्रशासन आणि पालकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
वेळ आहे 'समोपदेशनाची' आणि जागरूकतेची!
वाढत्या गुन्हेगारीवर केवळ पोलीस कारवाई करून उपयोग होणार नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे:
• पोलीस आणि शाळांचे संयुक्त पाऊल: पोलीस प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे 'समोपदेशन' (Counseling) करणे काळाची गरज आहे. कायदेशीर परिणाम आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी फसवणूक याबद्दल तरुणाईला सावध करणे आवश्यक आहे.
• पालकांनो, संवाद साधा: आपल्या पाल्यांच्या वागण्यात होणारे बदल, त्यांचे मित्र आणि त्यांचे मोबाईलमधील वावर याकडे पालकांनी बारकाईने लक्ष द्यायला हवे. मुलांशी भीतीमुक्त आणि मैत्रीपूर्ण संवाद साधल्यास अशा घटनांना आळा बसू शकतो.
• सुरक्षित वातावरण निर्माण करा: परिसरात होणारी रोडरोमिओगिरी आणि शाळा सुटण्याच्या वेळेस वाढणारी गर्दी यावर पोलिसांनी साध्या वेशातील गस्त वाढवून कडक कारवाई करणे अपेक्षित आहे.
चाकणमध्ये घडणाऱ्या या घटना केवळ पोलिसांचा विषय नसून, तो एक सामाजिक धोक्याचा इशारा आहे. वेळीच सावध होऊन मुलांच्या भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
1
Angry
0
Sad
0
Wow
0