Murder Story || ​"पुण्यात खून, बीडमध्ये विल्हेवाट! चिमुरड्या आवेजच्या खुनाचं 'कुरुळी टू धर्मापुरी' कनेक्शन उघड"

Apr 9, 2026 - 20:11
 0
Murder Story || ​"पुण्यात खून, बीडमध्ये विल्हेवाट! चिमुरड्या आवेजच्या खुनाचं 'कुरुळी टू धर्मापुरी' कनेक्शन उघड"

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

​पुणे : एका मातेने आपल्या पोटच्या ६ वर्षांच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या रागातून चिमुरड्याचा जीव घेऊन त्याचा मृतदेह हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या या निष्ठुर मातेचा आणि तिच्या प्रियकराचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे.

नेमकी घटना काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खेड तालुक्यातील कुरुळी येथे ही घटना घडली. आरोपी महिला बसरिन मेहबूब शेख (वय २७) हिचे आरोपी राम विनायक कजेवाड याच्याशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात तिचा ६ वर्षांचा मुलगा आवेज मेहबूब शेख हा अडथळा ठरत होता. याच कारणावरून दि. ०४ एप्रिल २०२६ रोजी रात्री २३:३० च्या सुमारास या दोघांनी संगनमत करून आवेजला बाथरुममधील पाण्याच्या बादलीत डोके बुडवून आणि त्याचे डोके भिंतीवर व जमिनीवर आपटून त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.

पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी रचला बनाव..

​हत्येनंतर गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी या घटनेला नैसर्गिक मृत्यूचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी आवेजचा मृतदेह अर्टिगा गाडीतून धर्मापुरी (ता. परळी, जि. बीड) येथे नेला. तेथे नातेवाईकांना आवेजचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचा खोटा बनाव सांगितला. मात्र, फिर्यादी इसाक अहमद शेख (वय ४९) यांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसी खाक्या दाखवताच फुटले गुपित...

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवाल आणि संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी आरोपी महिला बसरिन शेख हिची कसून चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या बसरिनने पोलिसी खाक्या दाखवताच आपला गुन्हा कबूल केला आणि या थरारक हत्याकांडाचा उलगडा झाला.

पोलिस कारवाई...

या प्रकरणी दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१), २३८, ६१(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिला बसरिन शेख हिला अटक करण्यात आली असून तिचा प्रियकर राम कजेवाड याचा पोलीस शोध घेत आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाय हे अत्यंत बारकाईने करत आहेत.

पुणे आणि बीड जिल्ह्यात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून, प्रेमसंबंधासाठी एका मातेने आपल्याच रक्ताच्या नात्याचा बळी घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी